Homeताज्या बातम्यादेश

तामिळनाडूमध्ये नव्या पर्वाला सुरूवातमुख्यमंत्री म्हणून विजय यांनी घेतली शपथ

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिम आमदार निवडून आलेला तामिळनाडू वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाचे संस्थापक थलापती विजय यांनी रविवार

तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळाविजय यांना काँगे्रसनंतर सीपीआयचा पाठिंबा
तामिळनाडूत विजय सरकारचा विश्‍वासदर्शक ठराव मंजूर144 आमदारांचा पाठिंबा; विरोधकांची तटस्थ भूमिका
तामिळ अस्मितेचे बहुमत !


चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिम आमदार निवडून आलेला तामिळनाडू वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाचे संस्थापक थलापती विजय यांनी रविवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्‍वनाथ अर्लेकर यांनी चेन्नईतील जवाहरलाल नेहरू क्रीडागृहात आयोजित सोहळ्यात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्यात प्रथमच द्रविड विचारसरणीबाहेरील पक्षाने सत्ता स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या नव्या सत्तांतरामुळे द्रमुक आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन प्रमुख पक्षांचे अनेक दशकांपासूनचे वर्चस्व संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. विजय यांच्यासह नऊ मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. आता 13 मेपूर्वी नव्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.शपथविधी होताच क्रीडागृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या गजरात विजय यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी एन. आनंद, अधव अर्जुन, डॉ. के. जी. अरुणराज, के. ए. सेनगोट्टैयन, पी. वेंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्तना यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. कीर्तना या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री ठरल्या.
शपथविधी सोहळ्यास विजय यांचे कुटुंबीय, चित्रपटसृष्टीतील मान्यवर तसेच आघाडीतील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. 2026 हे वर्ष तामिळनाडूच्या राजकारणातील नव्या युगाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. सोहळ्यातील प्रोटोकॉलमधील बदलही चर्चेचा विषय ठरला. सामान्यतः राज्य सरकारी कार्यक्रमांची सुरुवात ‘तामिळ थाई वंदना’ने होत असते; मात्र या वेळी प्रथम ‘वंदे मातरम’ सादर करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत आणि मग ‘तामिळ थाई वंदना’ झाली.
लोकाभिमूख कारभार करण्याचा निर्धार
मुख्यमंत्री विजय यांनी आपल्या पहिल्याच भाषणात पारदर्शक आणि लोकाभिमूख शासन चालवण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती जनतेसमोर मांडण्यासाठी श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. जनतेने सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. अमली पदार्थांविरोधात कठोर मोहीम राबविण्यात येईल आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सत्तेचे दुसरे कोणतेही केंद्र निर्माण होणार नसून, शासनात एकसंध नेतृत्व राहील, असेही त्यांनी नमूद केले.
200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या निर्णयाला मंजुरी
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच विजय यांनी घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. त्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. उद्घाटनपर भाषणात विजय यांनी आपण कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेलो नसून, जनतेनेच आपल्याला स्वीकारले असल्याचे सांगितले. त्यामुळे जनतेला खोटी आश्‍वासने देऊन फसवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

COMMENTS