Homeताज्या बातम्याराजकारण

तामिळनाडूत विजय सरकारचा विश्‍वासदर्शक ठराव मंजूर144 आमदारांचा पाठिंबा; विरोधकांची तटस्थ भूमिका

चेन्नई : तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. विश्‍वासदर्शक ठरावाच्या

खा. शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुकखासदार संजय राऊतांनी मात्र दर्शवली असहमती
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट; 20 खासदार देणार एनडीएला पाठिंबा
आंदोलन की राजकीय महत्त्वाकांक्षा : एक कटाक्ष


चेन्नई : तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने 144 आमदारांनी मतदान केले, तर 22 आमदारांनी विरोधात मत नोंदवले. पाच आमदार मतदानावेळी अनुपस्थित राहिले. विधानसभा अध्यक्ष जे.सी.डी. प्रभाकर यांनी ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.
विश्‍वासदर्शक ठराव मांडताना मुख्यमंत्री विजय यांनी सरकारला स्थिरता आणि सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. सभागृहात विविध पक्षांच्या नेत्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. काँग्रेससह डावे पक्ष, विदुथलाई चिरुथैगल काची, इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि एएमएमके यांनी सरकारला पाठिंबा दर्शविला. प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेने मतदान प्रक्रियेत सहभागी न होता सभात्याग केला. त्यामुळे पक्षाने प्रत्यक्ष विरोध नोंदविण्याऐवजी तटस्थ भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले. भाजपनेही आपल्या एकमेव आमदारासह मतदानावेळी तटस्थ भूमिका कायम ठेवली. एआयएडीएमकेमध्ये मात्र यावेळी मतभेद स्पष्टपणे समोर आले. पक्षाचे सरचिटणीस के. पलानीस्वामी यांनी सरकारवर टीका करत विरोधाची भूमिका घेतली. दुसरीकडे, पक्षातील बंडखोर गटाचे नेते एस. पी. वेलुमणी यांनी विजय सरकारला पाठिंबा जाहीर केला. अंबुमणी रामदास यांच्या नेतृत्वाखालील पीएमके पक्षाने मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. पक्षाचे चार आमदार मतदानावेळी अनुपस्थित राहिले.

COMMENTS