तामिळ अस्मितेचे बहुमत !

Homeदखल

तामिळ अस्मितेचे बहुमत !

       तामिळनाडूच्या राजकारणात आज घडलेली घटना ही सत्ताकारण, जनमत, राज्यपालांची भूमिका आणि प्रादेशिक अस्मितेच्या संघर्षातील एक मोठा टप्पा म्हणून प

ममतांची कसोटी, तृणमूलमध्ये फूट !
एसआयआरचा तिसरा टप्पा जाहीरमहाराष्ट्रासह 19 राज्यांत होणार मतदार पडताळणी37 कोटी मतदारांवर पडणार प्रभाव ; बूथस्तरीय अधिकार करणा तपासणी
पंतप्रधान मोदींच्या संमिश्र कालावधीचे एक तप !

       तामिळनाडूच्या राजकारणात आज घडलेली घटना ही सत्ताकारण, जनमत, राज्यपालांची भूमिका आणि प्रादेशिक अस्मितेच्या संघर्षातील एक मोठा टप्पा म्हणून पाहिली जाईल. विजय उर्फ “थळपति विजय” यांनी विधानसभेत १४४ आमदारांचा पाठिंबा मिळवत सत्तेवर शिक्कामोर्तब केले, पण या घटनेचा खरा केंद्रबिंदू केवळ आकडा नाही. खरी कथा आहे “एक मत कमी” या तांत्रिक कारणावरून त्यांना सरकार स्थापनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला असताना, काहीच दिवसांत त्यांच्याभोवती आणखी मोठे बहुमत कसे उभे राहिले? ही घटना भारतीय संघराज्याच्या राजकारणात खोल परिणाम करणारी आहे.सुरुवातीला विजय यांच्या आघाडीला बहुमतासाठी आवश्यक आकड्यापेक्षा एक मत कमी असल्याचे सांगितले गेले. अशा परिस्थितीत संसदीय परंपरेनुसार सर्वात मोठ्या आघाडीला संधी देणे ही अपेक्षित पद्धत मानली जाते. पण राज्यपालांनी विलंब, साशंकता आणि घटनात्मक तांत्रिकता यांचा आधार घेत परिस्थिती लांबवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली. भारतीय राजकारणात हे नवीन नाही. अनेक राज्यांत आपण पाहिले आहे की, निवडणूक निकालानंतर “कोणाला आधी निमंत्रण?” हा प्रश्न निव्वळ घटनात्मक राहत नाही; तो सत्तेच्या व्यापक संघर्षाचा भाग बनतो. तामिळनाडूतही तेच झाले. पण विजय यांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी ठरली. जेव्हा एखाद्या नेत्याला केवळ तांत्रिक कारणांवर अडवले जाते, तेव्हा सहानुभूतीची लाट तयार होते. विजय यांच्याबाबतही तेच झाले. तामिळ समाजात दीर्घकाळापासून केंद्र हस्तक्षेपाविरोधात एक सांस्कृतिक प्रतिकार आहे. द्रविड चळवळीपासून हा भाव निर्माण झाला की दिल्ली किंवा राज्यपाल संस्था तामिळ जनादेशावर प्रभाव टाकू पाहत आहेत. अशा वेळी विजय हे फक्त एक पक्षनेते राहिले नाहीत; ते “तामिळ जनमत रोखले जात आहे” या भावनेचे प्रतीक बनले. यामुळे सुरुवातीला संभ्रमात असलेले काही आमदार त्यांच्या बाजूला झुकले. भारतीय राजकारणात अनेकदा आमदार सत्तेच्या शक्यतेकडे पाहून निर्णय घेतात. पण येथे उलट घडले. राज्यपालांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या वादानंतर जनतेमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली. सोशल मीडिया, विद्यार्थी संघटना, चित्रपट क्षेत्र, द्रविडवादी गट आणि प्रादेशिक संघटनांनी “जनादेशाचा अपमान” असा प्रचार सुरू केला. अशा वेळी तटस्थ राहणाऱ्या किंवा दुसऱ्या गटाकडे झुकलेल्या आमदारांना जाणवले की जनमत विजय यांच्या बाजूने वेगाने सरकत आहे. म्हणूनच “एक मत कमी” असलेली आघाडी काही दिवसांत “१४४ आमदार” या ठोस आकड्यापर्यंत पोहोचली.  तामिळनाडूच्या राजकारणात व्यक्तिमत्त्वाला प्रचंड महत्त्व असते. एम जी रामचंद्रन, जे. जयललिता आणि एम. करूणानिधी यांच्या काळापासून “नेता म्हणजे जनभावनेचे केंद्र” अशी राजकीय परंपरा तयार झाली. विजय यांनी या भावनात्मक राजकारणाला आधुनिक डिजिटल प्रतिमेशी जोडले. त्यांची प्रतिमा भ्रष्टाचारविरोधी, तरुणांचा नेता, तामिळ अस्मितेचा आवाज, आणि दिल्लीसमोर न झुकणारा चेहराअशी उभी करण्यात आली. म्हणून राज्यपालांनी अडथळा निर्माण केला, तेव्हा तो फक्त घटनात्मक प्रश्न राहिला नाही; तो “तामिळ स्वाभिमान” या प्रश्नात बदलला. विजय यांना रोखण्यासाठी वेळकाढूपणा करणे ही रणनीती असू शकते. पण राजकारणात विलंब नेहमीच विरोधकांच्या फायद्याचा ठरत नाही. कारण जितका विलंब वाढला तितकी सहानुभूती वाढली, तितकी माध्यमांची चर्चा वाढली, तितकाच विजय यांचा “पीडित पण लढाऊ नेता” हा चेहरा मजबूत झाला.हेच भारतीय राजकारणातील मोठे सूत्र आहे! सत्तेला जर जनादेशाविरोधी म्हणून पाहिले गेले, तर विरोधी नेता वेगाने जनआंदोलनाचे प्रतीक बनतो.१४४ आमदारांचा पाठिंबा हा केवळ स्थिर सरकारचा संकेत नाही. तो एक राजकीय संदेश आहे. तो संदेश असा की आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झाला. पण आम्ही आणखी मजबूत होऊन परत आलो. जनादेश तांत्रिक खेळांनी बदलता येत नाही. यामुळे विजय यांची प्रतिमा एका नवख्या राजकारण्यापासून थेट प्रादेशिक शक्तिकेंद्रात रूपांतरित झाली आहे.

COMMENTS