’अम्फान’इतकेच घातक ठरणार ’यास’ चक्रीवादळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’अम्फान’इतकेच घातक ठरणार ’यास’ चक्रीवादळ

भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर काही दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाच्या तांडवाने मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रासह पाच राज्यांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला.

राज्यात पान मसाल्यावरील बंदीला स्थगिती नाहीच
व्यापार्‍यांसाठी अ‍ॅड. शेख शफीक भाऊ सरसावले; शिष्टमंडळासोबत एस.पी. साहेबांची घेतली भेट !
एटीएम कार्ड बदली करून 16 हजारांची फसवणूक

नवी दिल्लीः भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर काही दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाच्या तांडवाने मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रासह पाच राज्यांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. आता भारताला आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर यास हे चक्रीवादळ येणार आहे. हे वादळ पुढील 12 तासांत भीषण रूप घेईल, असे हवामन विभागने म्हटले आहे.

    बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य भागात कमी दबावाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत. पुढील 12 तासांत हे दबाव क्षेत्र उत्तर-पश्‍चिम दिशेला पुढे सरकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 24 मेपर्यंत आणखी तीव्र होईल आणि 26 मे रोजी ओडिशाची उत्तर किनारपट्टी आणि पश्‍चिम बंगाल आणि बांगला देशाच्या किनार्‍याला धडकेल, असा इशारा हवामान विभागाच्या भुवनेश्‍वर उपकेंद्राच्या उपसंचालकांनी दिला. ’यास’ चक्रीवादळाच्या वार्‍यांमुळे मोठे नुकसान होऊ शकते. या वादळामुळे ताशी 185 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हे चक्रीवादळ तौक्ते आणि अम्फान चक्रीवादळांइतकेच विध्वंसक असेल, असा इशारा हवामान विभागाचे डीजीएम मृत्युंजय महापात्रा यांनी दिला. बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य भागात कमी दबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील 12 तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हा कमी दबावाचा पट्टा तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल, असे हवामान विभागाने ताज्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. दरम्यान, वादाळाच्या पार्श्‍वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात येणार आहे. यापैकी 59 टीम तैनात झाल्या आहेत आणि 16 टीम स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली. 25 मे रोजी ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि 26 मे रोजी ओडिशा, झारखंड आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. 25 मे आणि 26 मे रोजी पश्‍चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस होईल. तसेच वेगवान वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केले आहे. बंगालचे उपसार आणि अंदमानच्या समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मोदी यांच्याकडून आढावा

’यास’ चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण होणार्‍या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये, केंद्रीय मंत्रालय आणि संस्थांच्या तयारीचा आढावा घेतला. यासंदर्भात त्यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकरी उपस्थित होते. समुद्र किनार्‍यावरील नागरिक, उद्योगांशी संपर्क करावा आणि त्यांना संवेदनशील बनवून मदत आणि बचाव कार्यासाठी तयारी करावी. किनारपट्टीवर राहणार्‍या नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे निर्देश मोदी यांनी दिले. वीजपुरवठा आणि टेलिफोन यंत्रणा बंद करण्याचा कालावधी हा कमीत कमी ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

वादळाच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सज्ज

राष्ट्रीय आरत्ती निवारण दलाने परिस्थितीचा सामना करण्यासाठी 46 पथके तैनात केली आहेत. पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नावा, झाडे आणि दूरसंचार उपकरणांनी सज्ज आहते. याशिवाय 13 टीम आज तैनातीसाठी एअरलिफ्ट करण्यात येणार आहेत. एनडीआरएफच्या 10 टीम स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचावकार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. लष्कराची इंजिनिअर टास्ट फोर्स आणि हवाई दलाची यंत्रणा, नावा आणि बचाव उपकरणांसह तैनातीसाठी सज्ज आहेत. यासोबतच सात जहाजे पश्‍चिम किनार्‍यावर स्टँडबाय ठेवण्यात आली आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

COMMENTS