Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आई ही प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिला गुरु : ऍड. देशपांडे ; ‘स्वाभिमानी माऊली’ पुरस्कारांनी आठ आदर्श मातांचा गौरव

कर्जत : आई ही प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिला गुरु असते. आपल्या मुलांवर सुसंस्कार करून त्यांना घडवणाऱ्या मातांचा सन्मान करणे, म्हणजे एका पिढीचा सन्मान करण्यासारखे आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या पॅनेलवरील सदस्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी केले. श्री साई बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने कौशल्याबाई भानुदास गोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित ‘स्वाभिमानी माऊली पुरस्कार’ वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ कर्तृत्ववान मातांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुण्याच्या एस.आय.आर.एफ. ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका सुमेता चिताडे यांनीही यावेळी महिलांच्या सक्षमीकरणावर जोर दिला. माजी आ. साहेबराव दरेकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे संयोजक ह.भ.प. राजेंद्र गोरे यांनी पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “गेल्या पाच वर्षांपासून आम्ही आमच्या मातोश्री कौशल्याबाई गोरे यांच्या स्मृती जपण्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत. समाजातील प्रत्येक स्वाभिमानी माऊलीमध्ये मला स्वतःच्या आईचे रूप दिसते. या मातांचा सन्मान करून आम्ही त्यांच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत. यावेळी भिमाबाई शंकर शिंदे (विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मातोश्री), कौसाबाई अप्पाजी शिर्के (प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्या मातोश्री), लीलावती जगन्नाथ जेवरे (पत्रकार गणेश जेवरे यांच्या मातोश्री), संगीता काशिबा तांबे,  पद्मिनीबाई धनाजी सूर्यवंशी, छायाताई प्रदीप तेली, लताताई निटके, पुष्पाताई रावसाहेब लगस या मातांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला अर्चना गोरे, ज्येष्ठ संपादक शिवाजी शिर्के, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, डॉ. रमेश झरकर, सद्गुरु उद्योग समूहाच्या अध्यक्षा कल्याणी नेवसे, उमेश कहाते, गुलाब तनपुरे, डॉ. विलास कवळे, पंढरीनाथ गोरे, नितीन खेतमाळीस, अमृत लिंगडे, संपतराव बावडकर, मीनाक्षी फडतारे यांसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सीना नदीपात्रात वाळू चोरी विरोधात कारवाई; कर्जत पोलिसांची कामगिरी ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
दिव्यांगांची थकीत पेन्शन तत्काळ द्या; चाँद शेख; शेवगाव तहसीलसमोर सावली दिव्यांग संघटनेचा ठिय्या
शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर ‘महसूल’ची कारवाईशेवगावात नाराजगी ; अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप

कर्जत : आई ही प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिला गुरु असते. आपल्या मुलांवर सुसंस्कार करून त्यांना घडवणाऱ्या मातांचा सन्मान करणे, म्हणजे एका पिढीचा सन्मान करण्यासारखे आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या पॅनेलवरील सदस्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी केले.

श्री साई बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने कौशल्याबाई भानुदास गोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित ‘स्वाभिमानी माऊली पुरस्कार’ वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ कर्तृत्ववान मातांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पुण्याच्या एस.आय.आर.एफ. ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका सुमेता चिताडे यांनीही यावेळी महिलांच्या सक्षमीकरणावर जोर दिला. माजी आ. साहेबराव दरेकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे संयोजक ह.भ.प. राजेंद्र गोरे यांनी पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “गेल्या पाच वर्षांपासून आम्ही आमच्या मातोश्री कौशल्याबाई गोरे यांच्या स्मृती जपण्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत. समाजातील प्रत्येक स्वाभिमानी माऊलीमध्ये मला स्वतःच्या आईचे रूप दिसते. या मातांचा सन्मान करून आम्ही त्यांच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत.

यावेळी भिमाबाई शंकर शिंदे (विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मातोश्री), कौसाबाई अप्पाजी शिर्के (प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्या मातोश्री), लीलावती जगन्नाथ जेवरे (पत्रकार गणेश जेवरे यांच्या मातोश्री), संगीता काशिबा तांबे,  पद्मिनीबाई धनाजी सूर्यवंशी, छायाताई प्रदीप तेली, लताताई निटके, पुष्पाताई रावसाहेब लगस या मातांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला अर्चना गोरे, ज्येष्ठ संपादक शिवाजी शिर्के, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, डॉ. रमेश झरकर, सद्गुरु उद्योग समूहाच्या अध्यक्षा कल्याणी नेवसे, उमेश कहाते, गुलाब तनपुरे, डॉ. विलास कवळे, पंढरीनाथ गोरे, नितीन खेतमाळीस, अमृत लिंगडे, संपतराव बावडकर, मीनाक्षी फडतारे यांसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS