अकोले : आदिवासी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले येथे ‘सॅम’ (तीव्र कुपोषित), ‘मॅम’ (मध्यम कुपोषित) तसेच दुर्धर आजारांनी ग्रस्त बालकांची संख्या वाढत असल्याने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार किसन लोहारे व पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवराम डगळे यांना देण्यात आले. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अकोले व राजुर यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांचे सातत्याने सर्वेक्षण केले जाते. तसेच तालुका आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालय अकोले अंतर्गत कार्यरत आरबीएसके पथकाद्वारे अंगणवाड्यांमध्ये बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. वाड्या-वस्त्यांमध्ये सर्वेक्षण करून कमी वजन व उंची असलेल्या बालकांचा शोध घेतला जात असून त्यांना नाचणीपासून तयार आहार, गूळ-शेंगदाणे लाडू, गावरान तूप, अंडी, केळी, सूक्ष्म पोषणतत्वे व जीवनसत्त्वयुक्त आहार किट देण्यात येत आहेत. पोषण अभियानांतर्गत पालक सभा, पोषण रॅली, महिला मेळावे व माता बैठका घेण्यात येत असून पोषण महिना व पंधरवडाही साजरा केला जात आहे. तसेच स्तनदा व गरोदर मातांना योग्य आहाराबाबत मार्गदर्शन केले जाते. दरम्यान, बालविकास प्रकल्प अधिकारी अकोले व राजुर येथील पदे गेल्या एक-दोन वर्षांपासून रिक्त असून प्रभारी अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अकोले आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र, अकोले शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, कार्याध्यक्ष महेश नवले, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, सचिव राम रुद्रे, प्रा. डॉ. सुनील शिंदे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित मंत्र्यांसह जिल्हाधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. कोट्यवधींचा खर्च ; शेकडो मुले कुपोषित केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करूनही कुपोषणाचे प्रमाण अपेक्षितरीत्या कमी झालेले नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या तालुक्यात ३८ बालके तीव्र कुपोषित, ३३८ बालके मध्यम कुपोषित गटात असून १८ बालके दुर्धर आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अकोले : आदिवासी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले येथे ‘सॅम’ (तीव्र कुपोषित), ‘मॅम’ (मध्यम कुपोषित) तसेच दुर्धर आजारांनी ग्रस्त बालकांची संख्या वाढत असल्याने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार किसन लोहारे व पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवराम डगळे यांना देण्यात आले.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अकोले व राजुर यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांचे सातत्याने सर्वेक्षण केले जाते. तसेच तालुका आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालय अकोले अंतर्गत कार्यरत आरबीएसके पथकाद्वारे अंगणवाड्यांमध्ये बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. वाड्या-वस्त्यांमध्ये सर्वेक्षण करून कमी वजन व उंची असलेल्या बालकांचा शोध घेतला जात असून त्यांना नाचणीपासून तयार आहार, गूळ-शेंगदाणे लाडू, गावरान तूप, अंडी, केळी, सूक्ष्म पोषणतत्वे व जीवनसत्त्वयुक्त आहार किट देण्यात येत आहेत.
पोषण अभियानांतर्गत पालक सभा, पोषण रॅली, महिला मेळावे व माता बैठका घेण्यात येत असून पोषण महिना व पंधरवडाही साजरा केला जात आहे. तसेच स्तनदा व गरोदर मातांना योग्य आहाराबाबत मार्गदर्शन केले जाते.
दरम्यान, बालविकास प्रकल्प अधिकारी अकोले व राजुर येथील पदे गेल्या एक-दोन वर्षांपासून रिक्त असून प्रभारी अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अकोले आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र, अकोले शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, कार्याध्यक्ष महेश नवले, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, सचिव राम रुद्रे, प्रा. डॉ. सुनील शिंदे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित मंत्र्यांसह जिल्हाधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
कोट्यवधींचा खर्च ; शेकडो मुले कुपोषित
केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करूनही कुपोषणाचे प्रमाण अपेक्षितरीत्या कमी झालेले नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या तालुक्यात ३८ बालके तीव्र कुपोषित, ३३८ बालके मध्यम कुपोषित गटात असून १८ बालके दुर्धर आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती देण्यात आली आहे.

COMMENTS