Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळणाऱ्या झाडांना ग्रामस्थांकडून ‘जीवदान’ग्रामपंचायत व सामाजिक संस्थांचा पुढाकार; सार्वजनिक बांधकामविरुद्ध संताप

बेलापूर : बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकात लावलेली झाडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळण्याच्या स्थितीत असताना ग्रामपंचायत व स्थानिक संस्था

डोक्यात फरशी घालून पित्याची हत्या; मारेकरी मुलगा जेरबंद ; राहात्यातील घटना 
ओबीसी समाजासाठी सदैव लढणार : मंत्री भुजबळ  
एनएमएमएस परीक्षेत कोतुळेश्वर विद्यालयाचे यश


बेलापूर : बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकात लावलेली झाडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळण्याच्या स्थितीत असताना ग्रामपंचायत व स्थानिक संस्थांनी पुढाकार घेत त्यांना पाणी देत ‘जीवदान’ दिले. या उपक्रमाचे वृक्षप्रेमींकडून कौतुक होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर दुभाजकात वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र उन्हाळ्याच्या तीव्रतेत या झाडांना पाणी न दिल्याने ती वाळू लागली होती. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांचीही अशीच दुरवस्था झाली होती. याबाबत बेलापूर बु. ग्रामपंचायत व ‘सत्यमेव जयते’ ग्रुपने सार्वजनिक बांधकाम विभागाचे वारंवार लक्ष वेधले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने स्थानिकांनीच पुढाकार घेत झाडे वाचविण्याचा निर्णय घेतला.
संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे व पत्रकार देविदास देसाई यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत, ‘सत्यमेव जयते’ ग्रुप व वर्गणीदारांच्या सहकार्याने झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या टँकरद्वारे पाणी देण्यात आले असून त्यानंतर खाजगी टँकरच्या माध्यमातूनही दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात आला.
या उपक्रमासाठी ‘सत्यमेव जयते’ ग्रुपचे सदस्य तसेच अभय बंगाळ, सुनिल अनाप, दीपक निंबाळकर, रवी खोडाळ आदी वृक्षप्रेमींनी आर्थिक योगदान दिले. ग्रामपंचायतीचे आरोग्य कर्मचारी बाबासाहेब प्रधान, अविनाश शेलार, दत्तात्रय वक्ते, योगेश अमोलिक, सुमित शेलार, सागर भिंगारदिवे यांनी प्रत्यक्ष कामात परिश्रम घेतले.
दरम्यान, बेलापूर बु. ग्रामपंचायत व ‘सत्यमेव जयते’ ग्रुपच्या सदस्यांनी झाडांच्या देखभालीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापुढेही झाडांच्या जोपासनेकडे दुर्लक्ष केल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा वृक्षप्रेमी संघटनांनी दिला आहे.

COMMENTS