Homeताज्या बातम्याबीड

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियञण कार्यक्रम वतीने घाट सावळीत जनजागृती शिबीर संपन्न.जिल्हा शल्यचिकित्सक सतिश कुमार सोळुंके यांचे अभियान.

श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था पोखरी संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र घाटसावळी व लोकनेते गोपिनाथराव मुंडे वृद्धाश्रम घाटसावळी येथे दि.14 हे

आरटीई प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ; बोगस कागदपत्रांवर कारवाईची मागणी
बीडमध्ये उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी समाजाचा महामोर्चाभाजप सरकारने जाती-जातीत भांडणे लावू नयेत;11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
बीड जि.प.मध्ये महापुरुषांचे 12 फुटी पूर्णाकृती पुतळे उभारावेत – पप्पू कागदेफुले-शाहू-आंबेडकरांच्या पुतळ्यांची उंची वाढवावी; रिपाइंचा ठाम आग्रह


श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था पोखरी संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र घाटसावळी व लोकनेते गोपिनाथराव मुंडे वृद्धाश्रम घाटसावळी येथे दि.14 हे रोजी जनजागृती शिबीर संपन्न झाले.
 जिल्हा रुग्णालय बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक मा.सतिशकुमार सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियञण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड वतीने एक दिवसीय जनजागृती शिबीर घाटसावळी येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास जाधव यांनी केले ते म्हणाले  बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव फड युवा नेते चंद्रकांत बप्पा फड व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन फड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाला भेट देऊन आनंद झाला . सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हे दोन्ही प्रकल्प छान व नेटक्या नियोजनात घाटसावळी येथे सुरू आहेत.पुढे बोलताना ते म्हणाले व्यसनमुक्ती हि काळाची गरज आहे युवकांनी व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे कार्यक्रमात पुढे नागनाथ भडकुंबे यांनी व्यसनमुक्ती विषयावर मार्गदर्शन केले व्यसनाचे दुष्परिणाम व त्यावरील उपाय योजना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमात पुढे डॉ अशोक मते यांनी व्यसनमुक्ती विषयावर मार्गदर्शन केले सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक,व शारीरिक नुकसान यावर सविस्तर मार्गदर्शन केले. व्यसनमुक्ती केंद्रातील कार्यक्रमानंतर लगेचच लोकनेते गोपिनाथराव मुंडे वृद्धाश्रम येथे लाभार्थी आज्जी आजोबा यांना मार्गदर्शन केले.आंबादास जाधव  नागनाथ भडकुंबे व डॉ अशोक मते, प्रियंका भोंडवे यांनी आज्जी आजोबा यांच्याशी मुक्त संवाद साधला मानसिक आरोग्यासाठी मोफत सहाय्य व समुपदेशन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक प्रा आजिनाथ शेरकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक अमोल नेहरकर, मेडिकल इन्चार्ज गिताराम गायकवाड, समुपदेशक वर्षा शेरकर रामनाथ मुळे, सतिश फड यांनी परीश्रम घेतले शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

COMMENTS