Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टीका

मुंबई ः सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याची भावना असली तरी, मराठा समाजाच्या तोंडाला सरकारने पानेच पुसली आहे. सरकारने कितीही ढोल वाजवले

…तर, शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार
महायुती सरकारला शेतकर्‍यांचा विसर
नवीन नवरदेव बाशिंग बांधून तयार

मुंबई ः सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याची भावना असली तरी, मराठा समाजाच्या तोंडाला सरकारने पानेच पुसली आहे. सरकारने कितीही ढोल वाजवले, उर बडवले तरी आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारने फसवल्याची भावना आहे. हे या सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिले नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. विधीमंडळात आज मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रुंपातर होणार आहे. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले. वडेट्टीवार म्हणाले. ‘सरकारने कितीही ढोल वाजवले, उर बडवले तरी आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारने फसवल्याची भावना आहे. हे या सरकारचे अपयश आहे. महायुतीचे सरकार हे फसवे सरकार आहे. हे मराठा समाजाच्या आता लक्षात आले आहे. दोन वेळा न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा या महायुती सरकारने दिले आहे. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे. तेलही नाही आणि तुपही नाही. आमच्या मराठा समाजबांधवांच्या हाती या महायुती सरकारने फक्त धुपाटणे दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारने ही नौटंकी केली आहे.’ अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली. राज्यातल्या इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आज दिलेले 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले गेले आहे. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. या महायुती सरकारमुळे मराठा समाजाचा पुन्हा भ्रमनिरास होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

COMMENTS