लोणी : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ४६ व्या पुण्यतिथी व लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त लोणी बुद्रुक

लोणी : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ४६ व्या पुण्यतिथी व लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त लोणी बुद्रुक येथे सोमवार (दि. २७ एप्रिल) पासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा ५ मे २०२६ पर्यंत चालणार आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथीपासून ते लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीपर्यंत दरवर्षी हा धार्मिक सोहळा आयोजित केला जातो. यंदाचा कार्यक्रम जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील तसेच माजी खासदार व भाजप उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम मंदिर प्रांगणात होत आहे.
या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. तसेच रात्री ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होईल.. यामध्ये सुधाकर महाराज वाघ (पैठण), रामरावजी महाराज ढोक (नागपूर), अक्रूर महाराज साखरे (गेवराई), प्रकाश महाराज साठे (बीड), रोहिणीताई परांजपे (पुणे), विश्वनाथ महाराज वारिंगे (डोंबिवली), सोपान महाराज सानप (हिंगोली) व जगन्नाथ महाराज पाटील (ठाणे) यांचा समावेश आहे. मंगळवार (दि. ५ मे) रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे कीर्तन होईल.

COMMENTS