Homeताज्या बातम्या

जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवारमध्ये भूस्खलन, रस्तेही बंद

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन झाले असून, 540 मेगावॅट क्षमतेच्या क्वार जलविद्युत प्रकल्पाजवळील परिसर

चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 
मिसिंग लिंक प्रकल्पाबाबतच्या अफवांवर भाजपने व्हिडिओ शेअर करत दिले थेट उत्तर, अतिवृष्टीमुळे आलेला मलबा प्रशासनाने अवघ्या काही वेळातच केला पूर्णपणे साफ!
पुणे जिल्ह्यात दरड कोसळली; वाहतूक ठप्प


जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन झाले असून, 540 मेगावॅट क्षमतेच्या क्वार जलविद्युत प्रकल्पाजवळील परिसरात मोठ्या प्रमाणावर माती व दगड कोसळले. या दुर्घटनेत उभी असलेली अनेक वाहने ढिगार्‍याखाली दबली गेली असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आतापर्यंत जीवितहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. बचाव पथके आणि यंत्रसामग्री घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगारा हटवून अडकलेली वाहने बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. हवामान विभागाने किश्तवार आणि आसपासच्या डोंगराळ भागात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर प्रशासनाने नागरिक आणि यात्रेकरूंना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, डोडा जिल्ह्यातील प्रेमनगर परिसरातही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. मोठ्या प्रमाणावर दगड व माती रस्त्यावर आल्याने डोडा-किश्तवार मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभागांकडून रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, हवामान अनुकूल झाल्यानंतर मार्ग पुन्हा खुला करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

COMMENTS