Homeताज्या बातम्याबीड

बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख रमशा तस्कीन ’डी.वाय.पाटील’ मधून एमबीबीएस; बोरफडीकर परिवारातील पहिली डॉक्टर!

जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर बीड येथील शेख रमशा तस्कीन हिने वैद्यकीय क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन केले आहे. पुणे येथील प्रसिद्ध डी. वाय.

शेतकर्‍यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे
मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला



जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर बीड येथील शेख रमशा तस्कीन हिने वैद्यकीय क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन केले आहे. पुणे येथील प्रसिद्ध डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधून रमशाने आपले वैद्यकीय शिक्षण (चइइड) यशस्वीपणे पूर्ण केले असून, आता ती डॉक्टर म्हणून जनसेवेसाठी सज्ज झाली आहे.
रमशा ही बीडचे नगरसेवक तथा स्वच्छता सभापती शेख निजाम यांची कन्या आहे. विशेष म्हणजे, तिचे आजोबा शेख जैनोद्दीनसेठ बोरफडीकर यांच्या संपूर्ण परिवारातील पहिली डॉक्टर होण्याचा मान रमशाने मिळवला आहे. या यशामुळे बोरफडीकर परिवारात आनंदाचे वातावरण असून, आजोबांचे आशीर्वाद (दुआ) आणि वडिलांचे पाठबळ यामुळेच हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. रमशा तस्कीन डॉक्टर झाल्याबद्दल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने: आमदार विजयसिंह पंडित,शेख जैनोद्दीनसेठबोरफडीकर, शेख बाबूसेठ बोरफडीकर, नगर अध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, शेख अमर, शेख अकबर शेख जब्बार सर यांनी रमशाचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर रमशा आता समाजातील गरजू रुग्णांची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. एका प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण पूर्ण केल्यामुळे तिच्या अनुभवाचा फायदा बीड जिल्ह्यासह समाजाला नक्कीच होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

COMMENTS