Homeताज्या बातम्या

आरोपींच्या घरावर जेसीबी चालवणारगुन्हेगारांना मुभा नाही; शिर्डी खून प्रकरणात माजी खा. विखेंचा इशारा

शिर्डी : शिर्डीतील खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक कडक करण्यासाठी तसेच मंदिर परिसरातील अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. खून प्रकरणातील आरोपी राहत असलेल्या अतिक्रमित घराला नोटीस बजावण्यात आली असून, आठवडाभरात अतिक्रमण हटवले नाही तर नगरपंचायतीमार्फत जेसीबीच्या साहाय्याने ते हटविण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. डॉ. विखे पाटील म्हणाले की, शिर्डीत घडलेली हत्या अत्यंत दुर्दैवी असून, गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि नियमानुसार कारवाई प्रत्येकावर केली जाईल. संबंधित आरोपीला अतिक्रमणाबाबत नोटीस देण्यात आली असून, मुदतीत कारवाई न झाल्यास प्रशासन स्वतः अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया राबवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.मंदिर परिसरातील अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र हॉकर झोन विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. साई मंदिराच्या चारही बाजूंच्या परिसरात कोणत्याही प्रकारची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नसून, पथविक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात येईल. कोण व्यवसाय करू शकतो, कोणत्या ठिकाणी व्यवसाय करता येईल आणि कोणत्या वस्तूंची विक्री करता येईल, याबाबतची सविस्तर नियमावली ग्रामस्थ, व्यापारी आणि संबंधित घटकांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे.मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक करणारे, जादा दर आकारणारे किंवा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे सांगत डॉ. विखे पाटील म्हणाले की, अशा प्रकरणात केवळ विक्रेत्यावरच नव्हे, तर संबंधित दुकानमालक आणि जागामालकावरही गुन्हे दाखल करण्यात येतील. गरीब विक्रेत्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही; त्यामागील मूळ सूत्रधारांवरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.वस्तूविक्रीबाबत संस्थानने स्पष्ट धोरण जाहीर करावेमंदिर परिसरातील फुले, प्रसाद, शाल आणि इतर पूजासाहित्याच्या विक्रीबाबत साई संस्थानने स्पष्ट धोरण जाहीर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. संस्थानने कोणत्या वस्तूंना परवानगी असेल आणि कोणत्या वस्तू मंदिरात स्वीकारल्या जातील, याबाबत ठोस निर्णय घेतल्यास भाविकांची लूट आणि अनधिकृत विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असे त्यांनी सांगितले.

पाटबंधारे विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारातच चहाचे दुकान; प्रशासनाच्या भूमिकेवर संशयअतिक्रमण हटविल्यानंतर शासकीय आवारात व्यवसाय सुरू; कार्यकारी अभियंता एस. एन. पवार यानी शासकीय जागा किरायाने दिली काय?
भररस्त्यात उमा भारतींनी तळले पोहे-जलेबी! गरिबांच्या पोटावर पाय देणाऱ्या प्रशासनाविरुद्ध अनोखे आंदोलन
हातगाडा व्यावसायिकांचा संताप; ’हप्ता द्या, नाहीतर कारवाई’च्या आरोपांनी शहरात खळबळ

COMMENTS