Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मारुती व्हॅनसह शितपेय चोरणारे 12 तासात मुद्देमालासह जेरंबद 

अहमदनगर : शीतपेय घेऊन जाणारी मारुती व्हॅन (क्रमांक एम एच 16 ए टी 1713) ही आतील शितपेया सह हॉटेलमध्ये पोहच करत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने गाडी

संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय LokNews24
अवैध धंदे करणार्‍यांच्या मुसक्या आवळा, अन्यथा शहरात गँगवार होतील
‘कोण होता शिवाजी’ पुस्तकाचे वाचन उपक्रम; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचा पुढाकार

अहमदनगर : शीतपेय घेऊन जाणारी मारुती व्हॅन (क्रमांक एम एच 16 ए टी 1713) ही आतील शितपेया सह हॉटेलमध्ये पोहच करत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने गाडी मालासह पळवुन नेली आहे. या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 379, प्रमाणे दाखल  गुन्हा दाखल केला. प्राप्त माहीतीच्या आधारे पोलीसांनी यातील आरोपी चंद्रकांत नानाभाऊ आजबे (वय 39 वर्षे रा. आदर्शनगर एमआयडीसी याचा शोध घेवुन 75 हजार रुपये किंमतीचे मारुती व्हॅन व शितपेय असा मुद्देमाल हस्तगत केला आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडें यांचे मार्गदर्शनाखालील पोलिस निरिक्षक मधुकर साळवे, पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलिस हवालदार दत्तात्रय जपे, पोलिस हवालदार सुनिल शिरसाट, पोलिस नाईक संदिप धामणे, अविनाश वाकचौरे वसीम पठाण, अहमद इनामदार, पोलिस नाईक शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, संदिप गि-हे,सचिन जगताप, सतिष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, , गौतम सातपुते, पोकॉ राहुल गुंडू सायबर पोलीस स्टेशन यांनी केली असुन पुढील तपास पोलिस हवालदार अनिल गिरीगोसावी हे करत आहेत.

COMMENTS