Homeताज्या बातम्या

 शिर्डीत आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळावा : मानगावे

कोपरगाव शहर  : ग्रामीण भागातील युवकांना उद्योजकतेची नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून ‘गाव तेथे उद्योजक’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राज्यभर राबविण्यात येणार असून, या अभियानातून हजारो नवउद्योजक घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच ७ ते ९ जानेवारी २०२७ दरम्यान शिर्डी येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी केली.कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेक इन कोपरगाव’ व ‘गाव तेथे उद्योजक’ उपक्रमाचा शुभारंभ तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक ओमप्रकाश (काका) कोयटे होते.अध्यक्षीय भाषणात काका कोयटे म्हणाले की, व्यापारी महासंघ व्यापाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असून ‘मेक इन कोपरगाव’मधून अनेक नवउद्योजक घडले आहेत. आता ‘गाव तेथे उद्योजक’ अभियान प्रत्येक ग्रामीण युवकापर्यंत पोहोचवून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी ऑनलाइन खरेदीमुळे किरकोळ व्यापाऱ्यांसमोरील अडचणी मांडत ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी ‘वन नेशन, वन वेट, वन रेट’ ही संकल्पना राबविण्याची मागणी केली. याचवेळी सुधीर डागा यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या रिटेलर विंगच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.आशिष पेडणेकर यांनी शिर्डी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्याची माहिती देताना सांगितले की, मेळाव्यात ५०० ते ७०० मशिनरींची प्रात्यक्षिके, उत्पादन, पॅकेजिंग व मार्केटिंगवरील प्रशिक्षण तसेच १० ते १२ देशांतील व्यापारी व उद्योजकांचा सहभाग असेल. भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे, निर्यातीच्या संधी वाढविणे आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे हा मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. स्वागत राजकुमार बंब, प्रास्ताविक सुधीर डागा, सूत्रसंचालन प्रदीप साखरे यांनी केले, तर सुमित भट्टड यांनी आभार मानले.  

कर्जतच्या राजकारणात अतिक्रमणावरून महासंग्राम गरिबांचा संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही; नगराध्यक्षा रोहिणी गुंड सभापती राम शिंदे विरुद्ध नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष आमनेसामने
सरसकट कर्जमाफीसाठी मंगळवारी पारनेर तहसीलवर मोर्चाखा. लंके यांच्या उपस्थितीत बैठक ; शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग
पवार विरुद्ध महायुती : राहुरी पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट, कोण मारणार बाजी?

COMMENTS