राजकोट: दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. वैमानिकाला विमानातील का

राजकोट: दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. वैमानिकाला विमानातील कार्गो कंपार्टमेंटमधून धूर निघताना दिसल्याने, सुरक्षिततेचा उपाय म्हणून विमान तातडीने राजकोट विमानतळावर उतरवण्यात आले.
या इंडिगोच्या विमानात वैमानिक आणि क्रू मेंबर्ससह एकूण १९४ प्रवासी प्रवास करत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानात असलेल्या सर्व प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना तातडीने आणि सुरक्षितपणे खाली उतरवले आहे.
इमर्जन्सी लँडिंगची माहिती मिळताच राजकोट महानगरपालिकेची २ अग्निशमन दलाची वाहने आणि २ रुग्णवाहिका तातडीने विमानतळावर दाखल झाल्या. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि डॉक्टरांचे पथक विमानतळावर सज्ज ठेवण्यात आले होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS