Homeताज्या बातम्या

राजा मुथुप्रांडीला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक; ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची शानदार कामगिरी

ग्लासगो: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची भर कायम राहिली असून पुरूषांच्या ६५ किलो वजन गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या राजा मुथु

कुंभमेळ्याच्या 2270 कोटींच्या निविदा जादा दराने कशासाठी?
राहुरी-शनीशिंगणापूर रेल्वेसाठी जमीन मोजणीला विरोध सोनईमध्ये शेकडो शेतकरी एकवटले; भूमीअभिलेख पथक हतबल
नवनगरांच्या निर्मितीबाबत शासनाने स्पष्ट माहिती द्यावीआमदार आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी

ग्लासगो: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची भर कायम राहिली असून पुरूषांच्या ६५ किलो वजन गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या राजा मुथुप्रांडी याने शानदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. दिवसातील भारताचे हे तिसरे पदक ठरले. कठोर परिश्रम, दुखापतींवर मात आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर राजा मुथुप्रांडीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली.

२६ वर्षीय राजा मुथुप्रांडीने स्पर्धेत स्नॅच प्रकारात १२६ किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात १६० किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण २८६ किलो वजन उचलून रौप्य पदकावर नाव कोरले. भारतीय खेळाडूच्या या कामगिरीमुळे वेटलिफ्टिंगमध्ये भारताची परंपरा आणखी बळकट झाली.

या गटात मलेशियाच्या अझनिल बिन बिदिन मोहम्मद याने एकूण २९९ किलो वजन उचलत सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, ही कामगिरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विक्रमी एकूण वजन ठरली. यासह त्याने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व कायम राखले. यापूर्वी त्याने गोल्ड कोस्ट २०१८ आणि बर्मिंगहॅम २०२२ स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते.

राजा मुथुप्रांडीने स्पर्धेची सुरुवात अत्यंत आत्मविश्वासाने केली. स्नॅच प्रकारातील दुसऱ्या प्रयत्नात त्याने १२६ किलो वजन यशस्वीरीत्या उचलून आघाडीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर क्लीन अँड जर्क प्रकारातही दुसऱ्या प्रयत्नात १६० किलो वजन उचलत त्याने एकूण २८६ किलोची नोंद केली. सातत्यपूर्ण आणि संयमी कामगिरीच्या बळावर त्याने भारतासाठी महत्त्वाचे रौप्य पदक जिंकले.

राजा मुथुप्रांडीचा हा प्रवास संघर्षमय राहिला आहे. २०१९ मध्ये कोपऱ्याच्या अस्थिबंधनाला (Ligament) गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याची कारकीर्द धोक्यात आल्याचे मानले जात होते. त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे पुनर्वसन प्रक्रियेलाही मोठा फटका बसला, ज्यामुळे त्याला अपेक्षित वेगाने सराव करता आला नव्हता. तरीही सर्व अडचणींवर मात करत त्याने हे यश संपादन केले.

COMMENTS