Homeताज्या बातम्या

औरंगपूर दरोड्यातील फरार आरोपी जेरबंद; ‘एलसीबी’ची धडक कारवाई, पाडळी रांजणगाव येथून अटक

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे झालेल्या दरोडा प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. शरद कैलास काळे (वय ४२,

दिल्लीतील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ माहूरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन; आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप
काळू धबधब्यावर दोन ट्रेकर्सचा मृत्यू; पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने दुर्दैवी घटना
पायी लाँग मार्चची २६ जूनला चैत्यभूमीवर सांगता; उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादी युवकांचे एकजुटीचे आवाहन

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे झालेल्या दरोडा प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. शरद कैलास काळे (वय ४२, रा. कडूस, ता. पारनेर, ह.मु. पाडळी रांजणगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास औरंगपूर येथील अशोक केरू वाळुंज यांच्या घरात चार अज्ञात आरोपींनी प्रवेश केला. घरातील सर्वजण झोपेत असताना आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी १४ जुलै २०२६ रोजी अजय सादिश काळे (रा. वाळुंज, ता. जि. अहिल्यानगर) आणि अक्षय उर्फ सोन्या अर्पण भोसले (रा. घानेगाव, ता. पारनेर) या दोन आरोपींना अटक केली होती. मात्र, तिसरा आरोपी शरद काळे हा फरार होता.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, सागर ससाणे, रोहित येमूल, अमोल कोतकर, अमोल आजबे, चालक महादेव भांड यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे फरार आरोपीचा शोध सुरू ठेवला. २४ जुलै रोजी आरोपी पाडळी रांजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी अकोले पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांमधून कौतुक व स्वागत केले जात आहे.

COMMENTS