Homeताज्या बातम्या

गोकुळची निवडणूक लढवणार नाही; मंत्री हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; यवतमाळ जिल्ह्यातील भाम गावातील दुर्दैवी घटना
ब्रेडच्या पुड्यात माशी; ’गोदावरी स्वीट बेकरी’च्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह! ग्राहकाचा संताप, व्हिडिओ व्हायरल
कोपरगाव-निफाड परिसरातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी; आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, ७.२९ कोटींचा निधी मंजूर
Hassan Mushrif Declares Exit from Gokul Milk Union Election | Kolhapur

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. “मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही आणि यापुढे गोकुळचा चेअरमनही राहणार नाही. आता कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आली आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे थेट संकेत दिले आहेत. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय आपण पक्का घेतला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

COMMENTS