Homeताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचे नेतृत्व देशाला नवी दिशा देणारे; काँग्रेस ‘बुडते जहाज’ म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विरोधकांवर टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रव

रुपयाच्या घसरणीवरून लोकसभेत खडाजंगी; देशाची आर्थिक स्थिती मजबूत, वित्तीय तूट नियंत्रणात : अर्थमंत्री सीतारामन
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाददिनदयाळ बँकेचे सीईओ महेश शेळके सायकलवरून पोहोचले बँकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आसाममधील चहाच्या माळ्याला भेट;काम करणार्‍या महिलांशी सदाला संवाद; मोदींनी केले मळ्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर
Devendra Fadnavis calls Congress a 'sinking ship' amid merger buzz

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. देशाच्या आर्थिक प्रगतीपासून पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मूलन आणि जागतिक स्तरावरील भारताच्या वाढत्या प्रभावापर्यंत विविध क्षेत्रांतील बदलांचा उल्लेख करत त्यांनी मोदी हे देशातील सर्वाधिक काळ निवडून आलेलेच नव्हे, तर सर्वोत्तम पंतप्रधान असल्याचे सांगितले. याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवरही कडक शब्दांत टीका केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काँग्रेसमधील विविध पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवरून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. काँग्रेसची स्थिती सध्या ‘बुडत्या जहाजासारखी’ असल्याचा दावा करत त्यांनी इतर पक्षांचे नेते अशा परिस्थितीत चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असे म्हटले. विरोधकांमधील संभाव्य राजकीय फेरबदलांचा भारतीय जनता पक्षावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी यांनी सलग ४,३९९ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. मात्र, एखाद्या नेत्याचा कार्यकाळ किती मोठा आहे यापेक्षा त्या काळात देशासाठी किती आणि काय काम झाले, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळातही भारताचा विकासदर सात टक्क्यांपेक्षा अधिक असून देश जगातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. परकीय चलन साठ्यातील वाढ, वाढती गुंतवणूक आणि मजबूत आर्थिक स्थितीमुळे भारताची जागतिक विश्वसनीयता वाढल्याचा दावा त्यांनी केला.

डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय यश मिळविल्याचे सांगत त्यांनी देशात एकात्मिक डिजिटल देयक प्रणालीद्वारे (UPI) विक्रमी आर्थिक व्यवहार होत असल्याचे नमूद केले. ही प्रणाली आता अनेक देशांकडून स्वीकारली जात असून भारताच्या तंत्रज्ञान क्षमतेचे ते प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग आणि उत्पादन क्षेत्रातही भारत मोठी झेप घेत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. विशेषतः अर्धवाहक (सेमीकंडक्टर) उद्योगात देश जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. गेल्या बारा वर्षांत भारताला मिळालेल्या विविध आंतरराष्ट्रीय सन्मानांमुळे जगाचा भारताच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले. गरिबी निर्मूलनाच्या क्षेत्रात केंद्र सरकारने मोठी कामगिरी केल्याचा दावा करत फडणवीस म्हणाले की, कोट्यवधी नागरिकांना तीव्र गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. अन्नसुरक्षा योजना, शेतकरी सहाय्य योजना, घरकुल योजना आणि करसवलतींसारख्या उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हवामानाचा विचार करून शेतकऱ्यांनी पेरणी करावी शेतकऱ्यांनी हवामान आणि शासनाच्या सूचनांचा विचार करूनच पेरणी करावी, असे आवाहन करत जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीसंदर्भात स्थापन करण्यात आलेली समिती अभ्यास करत असून निर्णय शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पारंपरिक पिकांबरोबरच पर्यायी पीक पद्धती स्वीकारण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले.

COMMENTS