Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

काँगे्रस अध्यक्ष खरगेंच्या विधानावरून भाजप आक्रमकनिवडणूक आयोगाकडे धाव घेत कारवाईची केली मागणी

नवी दिल्ली : पंतप्रधानांविषयी करण्यात आलेल्या कथित अवमानकारक वक्तव्यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, या प्रकरणी भारतीय जनता प

 ‘गुलाबराव तुमचा माज उतरवणार’ ; सुषमा अंधारें 
फटा ऑर्डीनन्स और आउट हो गया राहुल म्हणत भाजपा कार्यकर्त्यांची राहूल गांधीविरोधात निदर्शने
शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक


नवी दिल्ली : पंतप्रधानांविषयी करण्यात आलेल्या कथित अवमानकारक वक्तव्यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने आयोगाची भेट घेत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.
भाजपच्या तक्रारीनुसार, काँग्रेस अध्यक्षांनी सार्वजनिक व्यासपीठावरून पंतप्रधानांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्दांचा वापर केला. हे वक्तव्य केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून देशाच्या सर्वोच्च लोकप्रतिनिधीच्या पदालाच कमी लेखणारे असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. त्यामुळे या प्रकरणी निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका भाजपने मांडली आहे.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना किरेन रिजिजू यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्ही अत्यंत दुःख आणि संतापाच्या भावनेतून आयोगाकडे आलो आहोत. पंतप्रधानांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे ही केवळ वैयक्तिक टीका नसून देशाच्या सन्मानालाच धक्का देणारी बाब आहे. त्यांनी पुढे सांगितले की, लोकशाहीत मतभेद असू शकतात; मात्र व्यक्ती आणि पदाचा अपमान करणे योग्य नाही. निर्मला सीतारामन यांनीही या मुद्द्यावर कठोर भाष्य करताना म्हटले की, देशातील एक वरिष्ठ नेता आणि विरोधी पक्षाचा प्रमुख म्हणून जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असते. त्यांनी नमूद केले की, संबंधित वक्तव्य हे खाजगी संभाषणात नव्हे, तर निवडणूक असलेल्या राज्यात माध्यमांसमोर करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढते. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे राजकीय संस्कृतीचा स्तर खालावतो, अशी टीकाही त्यांनी केली. सीतारामन यांनी पुढे सांगितले की, पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात शोक आणि आदराचे वातावरण असताना असे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, देशातील नागरिक त्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करत असताना विरोधी पक्षाकडून अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS