Homeताज्या बातम्या

रूपाली ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ पदवी जाहीर

सुपा : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशाला, तळेगाव ढमढेरे येथील उपशिक्षिका रूपाली अनिल ढमढेरे यांना सावित्रीबाई

दीपक शिंदे यांचा श्रीगोंद्यात सत्कार
धीरज बोर्डेचे ‘सिडको’ च्या परीक्षेत यश  
डॉ. भावना धन्वे यांचा सत्कार

सुपा : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशाला, तळेगाव ढमढेरे येथील उपशिक्षिका रूपाली अनिल ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी जाहीर झाली आहे.

ढमढेरे यांनी ‘दिनमित्रमधील अग्रलेखांचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास (इ.स. १९१० ते १९३० या कालखंडाच्या संदर्भात)’ या विषयावर संशोधन पूर्ण केले. हे संशोधन प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर येथील संशोधन केंद्रामार्फत पूर्ण करण्यात आले.

या संशोधनासाठी ज्येष्ठ संशोधक तथा मार्गदर्शक प्रा. डॉ. वसंत रघुनाथ शेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन कार्यादरम्यान त्यांना पती अनिल ढमढेरे, प्रा. डॉ. संदीप सांगळे, दिनमित्रचे संस्थापक मुकुंदराव पाटील यांचे नातू उत्तमराव पाटील तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्य लाभले.

पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील पूर्वाश्रमीच्या रूपाली किसनराव देशमुख असलेल्या सौ. ढमढेरे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल जन्मगाव रांजणगाव येथेही आनंद व्यक्त करण्यात आला. सामाजिक, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे तळेगाव ढमढेरे परिसराच्या शैक्षणिक लौकिकात भर पडल्याची भावना व्यक्त होत आहे.

COMMENTS