Homeताज्या बातम्या

खांबामधील विद्युत प्रवाहाने बैलाचा मृत्यूसहा जण वाचले, नाथापूर येथील घटना

बीड तालुक्यातील नाथापूर शिवारात पेरणी करत असताना शेतामध्ये उभा केलेल्या खांबामध्ये विद्युत प्रवाह आल्याने एका बैलाचा मृत्यू झाला असून सहा जण बाल

विचार, तत्त्व, निष्ठा विरूद्ध व्यक्ती, सत्ता आणि स्वार्थ!
नाझिया इलाही खान यांच्या अटकेची मागणी; कारवाई न झाल्यास शुक्रवारी ‘जन आक्रोश मोर्चा’चा इशारा
मेजर नंदकुमार सैंदोरे यांचा आदर्श युवकांना प्रेरणादायी : ह.भ.प. भागवतराव मुठे पाटील



बीड तालुक्यातील नाथापूर शिवारात पेरणी करत असताना शेतामध्ये उभा केलेल्या खांबामध्ये विद्युत प्रवाह आल्याने एका बैलाचा मृत्यू झाला असून सहा जण बाल बाल वाचल्याची घटना दि. 1 जुलै रोजी घडली आहे. दरम्यान सदरील शेतकर्‍याला महावितरणाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
नाथापूर शिवारात कैलास भाऊसाहेब चव्हाण हे आपल्या शेतामध्ये पेरणी करत होते. उशिरा आलेल्या पावसाने जमिनीत ओल झाल्यामुळे या भागात सध्या पेरणीची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कैलास चव्हाण हे पेरणी करत होते पेरणी करत असताना शेतात महावितरणने उभा केलेल्या पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. याची कल्पना नसताना या खांबा जवळून बैल आणि पेरणी करणारे जात असतानाच विद्युत खंबा मधील विद्युत प्रवाहाने बैलाला झटका बसला आणि बैल जागेवरच मृत्यू पावला मात्र हा प्रकार सदरील शेतकर्‍यांच्या लक्षात येतात जवळ असलेले  नागरिक वाचले असून एका बैलाला वाचवण्यात सदरील शेतकर्‍याला यश आले आहे. हा बैल मृत्यू पावल्यामुळे या शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास एक लाख रुपये किमतीचा हा बैल मरण पावल्याने परिसरातील शेतकर्‍यांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान महावितरणच्या चुकीमुळे थांबा मध्ये विद्युत प्रवाह उतरला असून सदरील विद्युत प्रवाहने बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महावितरणने सदरील शेतकर्‍याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

COMMENTS