Homeव्हिडीओ

बालमटाकळीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण

https://youtu.be/LnqkIz_eSRw दिवसेंदिवस हवामानात बदल होत चालला असून प्रदूषण वाढत चालले आहे , याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत असून वाढत्या प्रद

घरकुल लाभार्थ्यांच्या तांत्रिक त्रुटी तातडीने सोडवून हप्ते खात्यात जमा करा: सरपंच भागवत दराडे यांची मागणी
मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामपंचायत अधिकार्‍यांना वरिष्ठांचे अभय?ग्रामस्थांच्या सेवांचा बोजवारा; ग्रामीण विकासाच्या उद्दिष्टांनाच हरताळ
शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द!महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ; शेतकर्‍यांची अडवणूक करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई

दिवसेंदिवस हवामानात बदल होत चालला असून प्रदूषण वाढत चालले आहे , याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत असून वाढत्या प्रदूषणामुळे आणि हवामानातील बदलांमुळे मानवी अस्तित्व धोक्यात आले असल्याने शुद्ध हवा, मुबलक पाणी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्षारोपण ही आज काळाची गरज बनली आहे . झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन मुबलक प्राणवायू देतात आणि जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण ठेवतात .
निसर्ग मानवाला सदैव निस्वार्थ भावनेने प्रेम , स्नेह देत असल्याने आपलेही तेवढेच कर्तव्य आहे की ‘ त्या बदल्यात निसर्गावर आपणही किंबहुना जास्त प्रेम केले पाहिजे , एक वृक्ष हा मानवच नव्हे तर सूक्ष्म जीवजंतू ‘ पशुपक्षी या सर्वांना निस्वार्थ लाभ प्रदान करत असतो , त्यामुळे वृक्षारोपण ही आज तरी काळाची गरज बनली असल्याने शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात व विविध जातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे .
एकीकडे वृक्षारोपण तर दुसरीकडे वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल होऊन वाहने मोठ्या प्रमाणात भरून राजरोसपणे रस्त्याने धावत आहेत , वनाधिकाऱ्यांनी देखील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे .

COMMENTS