श्रीरामपूर : भारतीय आर्मीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर कठीण परीक्षा व प्रशिक्षणानंतर मेजर नंदकुमार संतराम सैंदोरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड होऊ

श्रीरामपूर : भारतीय आर्मीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर कठीण परीक्षा व प्रशिक्षणानंतर मेजर नंदकुमार संतराम सैंदोरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड होऊन श्रीनगर येथे त्यांची नेमणूक झाली, हा त्यांचा श्रमशील जीवनप्रवास देशभक्ती आणि समाजसेवा वृत्तीचा आदर्श आजच्या युवकांना प्रेरणादायी असल्याचे मत श्रीमद भागवत कथाकार ह.भ.प. भागवतराव मुठे पाटील यांनी व्यक्त केले.
नंदकुमार सेंदोरे यांच्या सत्कारप्रसंगी बोरावकेनगर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅङ् रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभी प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. याप्रसंगी आंतरभारती श्रीरामपूर शाखा अध्यक्ष माजी प्राचार्य सुभाष लिंगायत, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, प्रा. एकनाथ औटी, कवयित्री डॉ. संगीता फासाटे – कटारे आदिंनी मेजर नंदकुमार सेंदोरे, श्रीराम अबॅकस संचालिका प्रा. सौं. पल्लवी सैंदोरे, डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाचे संजय बुरकुले,सौ. सुरेखा बुरकुले, पीएच.डी. प्राप्तीबद्दल डॉ. संगीता फासाटे या सर्वांचा सत्कार करण्यात आला. या सर्व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. ह.भ.प. भागवतराव मुठे पाटील यांनी श्रीनगरला साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या संयोजनाखाली साहित्य संमेलन घ्यावे, आम्ही सर्व साहित्यिक येऊ असे आवाहन मेजर सैंदोरे यांना केले असता, असे संमेलन घेऊ असे आश्वासन सेंदोरे यांनी दिले. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून पीएसआय मेजर सैंदोरे, प्रा. सौ.पल्लवी सेंदोरे, संजय बुरकुले, सुरेखा बुरकुले, डॉ. संगीता फासाटे यांचा गौरव करून अशी व्यक्तिमत्त्वे श्रीरामपूरचा नावलौकिक वाढवितात, असे सांगून सुकळेसर हे गुणग्राहक म्हणून कौतुक केले.
देशभक्ती, समाजसेवा करताना भीती नको भक्ती हवी ः सैंदोरे
सन्मानचिन्ह, शाल, बुके, पुस्तके, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कारकेल्याबद्दल पीएसआय मेजर नंदकुमार सैंदोरे यांनी सुखदेव सुकळे, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, विविध संस्था, व्यक्तींनी केलेला हा सन्मान मला सदैव राष्ट्रसेवा करण्यायासाठी बळ देणारा ठरेल, अशी देशभक्ती, समाजसेवा करताना भिती नको, भक्ती हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सेवा वाटेवर स्व.वडील संतराम त्र्यंबक सैंदोरे, आई चंद्रकला सैंदोरे, बंधू रवींद्र सैंदोरे, पत्नी प्रा.सौ.पल्लवी सैंदोरे, सासरे डॉ. बाबुराव उपाध्ये, मेहुणे कचरू जोर्वेकर, गणेशानंद उपाध्ये, नितीन जोर्वेकर,भगिनी, मामी, मामी सर्व कुटुंबीय तसेच मांजरी ग्रामस्थ,मित्रपरिवार यांचे आशीर्वाद,प्रोत्साहन त्यांनी केलेले सत्कार आणि अंतरंगाची देशप्रीती हीच माझी भक्तीसाधना प्रेरक असल्याचे सांगून मेजर सैंदोरे यांनी आपले आर्मीतील अनुभव सांगितले.

COMMENTS