Homeताज्या बातम्या

शालेय पोषण आहारावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई2 शाळांमधून सुमारे 2.34 लाखांचा अन्नसाठा जप्त; नमुने प्रयोगशाळेत, अहवालानंतर होणार कारवाई

नांदेड : शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा संदेश देत अन्न व औषध प्रशासनाने

चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांकच नाहीश्रीगोंद्यात  ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
किनवट तालुक्यात नियमांची ऐशीतैशी; उघड्यावरील मांस विक्रीमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात!’एसी’तील प्रशासनाच्या डोळेझाक धोरणामुळे महामारीची टांगती तलवार; अन्न सुरक्षा कायद्याला हरताळ.
भंडाऱ्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; मधुमेह, हृदयरोग त्वरित बरे करण्याचा दावा करणारी औषधे जप्त
lack of raw material hit midday meals scheme in maharashtra zws 70


नांदेड : शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा संदेश देत अन्न व औषध प्रशासनाने नांदेड शहरातील दोन शाळांमध्ये धडक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत सुमारे 2 लाख 34 हजार 330 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून विविध अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार 2 जुलै रोजी ही तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी शिल्पा श्रीरामे यांच्या नेतृत्वाखाली व्ही. एस. लोंढे, अरुण तम्मडवार, अमृता दुधाटे आणि अ. नं. गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासणीदरम्यान बाबानगर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात रिफाइंड सोयाबीन तेल, सोया वडी, तांदूळ आणि तूर डाळ यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच शिल्लक असलेला 398 किलो सोया वडी, 2,998 किलो तांदूळ आणि 998 किलो तूर डाळ असा एकूण 2 लाख 24 हजार 530 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. यानंतर पथकाने वसंतनगर येथील राजर्षी शाहू विद्यालयात तपासणी करून सोया वडी, तांदूळ आणि मूग डाळ यांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले. येथे 98 किलो सोया वडीचा 9 हजार 800 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही संपूर्ण कारवाई सहायक आयुक्त सु. द. जिंतुरकर तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार पोषण आहार उपलब्ध व्हावा, यासाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

COMMENTS