Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा पालिकेसाठी आज भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

सातारा / प्रतिनिधी : सातारा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून सातारा नगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक प

बसवर ’जय महाराष्ट्र’ लिहून गाडीला फासले काळे; कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा तात्काळ बंद
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात स्वागत
जिहे-कठापूरसाठी 697 कोटी मिळणार; जलपूजनासाठी पंतप्रधान खटावला येणार

सातारा / प्रतिनिधी : सातारा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून सातारा नगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती उद्या सोमवार, दि. 10 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत हॉटेल फर्न, सातारा येथे घेण्यात येणार आहेत.
नगरसेवक पदासाठी सकाळी 9 ते 10.30 यावेळेत प्रभाग क्र. 1 ते 6, सकाळी 10.30 ते दुपारी 12 पर्यंत प्रभाग क्र. 7 ते 12, दुपारी 12 ते 1.30 यावेळेत प्रभाग क्र. 13 ते 18 आणि दुपारी 1.30 ते 3 यावेळेत प्रभाग क्र. 19 ते 25 या प्रभागासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तसेच दुपारी 3 ते 3.30 यावेळेत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहर निवडणूक प्रभारी विकास गोसावी, अ‍ॅड. दत्तात्रय बनकर व इतर पदाधिकारी घेणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिलेला अर्ज भरून त्याच्या तीन झेरॉक्स सोबत घेऊन वेळेच्या 15 मिनिट अगोदर मुलाखत स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS