विशेष सखोल पुनरीक्षण (डखठ) 2026 अभियानास बीड जिल्ह्यात प्रारंभ झाला असून, घरभेटीद्वारे बीएलओ (इेेींह ङर्शींशश्र जषषळलशी) यांच्या माध्यमातून गणना

विशेष सखोल पुनरीक्षण (डखठ) 2026 अभियानास बीड जिल्ह्यात प्रारंभ झाला असून, घरभेटीद्वारे बीएलओ (इेेींह ङर्शींशश्र जषषळलशी) यांच्या माध्यमातून गणना प्रपत्र (एर्पीाशीरींळेप ऋेीा) भरण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने जिल्हा प्रशासनामार्फत सुरू केलेल्या या अभियानाला सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर बुंदेलपुरा येथील मशिदीत आयोजित जनजागृती कार्यक्रमात -झउठ (-ीीेलळरींळेप षेी झीेींशलींळेप ेष उर्ळींळश्र ठळसहीीं) चे प्राध्यापक सय्यद शफीक हाश्मी यांनी नागरिकांना एसआयआर मोहिमेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून, प्रत्येक मतदाराने बीएलओंना संपूर्ण सहकार्य करणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक बाब आहे. प्रा. हाश्मी यांनी स्पष्ट केले की, एसआयआर मोहिमेबाबत कोणत्याही प्रकारची भीती किंवा गैरसमज बाळगण्याचे कारण नाही. कोणत्याही पात्र मतदाराला विनाकारण त्रास होणार नाही. मात्र, प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक मतदाराने आपले पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे तयार ठेवावीत आणि बीएलओ घरभेटीदरम्यान आवश्यक माहिती प्रामाणिकपणे उपलब्ध करून द्यावी. यावेळी उपस्थित नागरिकांनीही मतदार यादी अधिक सक्षम व त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या उपक्रमास सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाला परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जमात-ए-इस्लामी हिंद, बीडचे शाखाप्रमुख शेख मोइजोद्दीन यांनी उपस्थितांचे आभार मानले. सशक्त मतदार यादी – सशक्त लोकशाही या संदेशासह नागरिकांनी एसआयआर 2026 अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लीमसच्या वतीने यावेळी करण्यात आले.

COMMENTS