सांगली: प्रेमसंबंधात येणारा अडथळा दूर करण्यासाठी एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघड

सांगली: प्रेमसंबंधात येणारा अडथळा दूर करण्यासाठी एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र विश्रामबाग पोलिसांच्या सतर्कतेमुळे या हत्येचा पर्दाफाश झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मृत आनंदा सर्जे यांची पत्नी पल्लवी सर्जे आणि तिचा प्रियकर दीपक आजमाने या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS