Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषदेसाठी उमेदवाराचा पेच वाढलाअर्ज दाखल करण्यासाठी उरले अवघे दोन दिवस

मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच सर्वच राजकीय पक्षांचा उमेदवारीचा पेच अद्याप सुटला

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा उधाण; ठाकरेंच्या 2 खासदारांची शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला उपस्थिती
राज्यात शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक?; विरोधी गटातील खासदारांवर मात्र लक्ष कायम
मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न


मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच सर्वच राजकीय पक्षांचा उमेदवारीचा पेच अद्याप सुटला नसल्याचे दिसून येत आहे. 12 मे रोजी होणार्‍या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस आणि महाविकास आघाडी या पक्षांमध्ये उमेदवार निवडीमध्ये एकमत होऊ शकलेले नाही.
महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे. मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांकडून ठाकरे यांनी स्वतः मैदानात उतरावे, असा आग्रह सातत्याने धरला जात आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार ठाकरे यांची भूमिका अजूनही नकारात्मकच असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आघाडीतील नेत्यांची चिंता वाढली आहे. ठाकरे गटातील काही वरिष्ठ नेतेदेखील त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानपरिषदेत ठाकरे यांची उपस्थिती आघाडीला राजकीय बळ देऊ शकते, असे मत मांडले जात आहे. तरीही ठाकरे यांनी अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असे संकेत आहेत. दरम्यान, ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय कायम ठेवल्यास त्यांच्या पक्षातील पर्यायी चेहर्‍यांवर चर्चा सुरूयांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. या सर्वांमध्ये अंतर्गत स्पर्धाही असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस पक्षातही काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. बाळासाहेब थोरात, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत आणि राजेश राठोड यांची दावेदारी पुढे येत आहे. त्यामुळे एका जागेसाठी अनेक इच्छुक असल्याने आघाडीत एकमत साधणे अधिकच कठीण झाले आहे. संख्याबळाच्या दृष्टीने पाहता, या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. एका उमेदवाराला विजयासाठी सुमारे 28 मतांची गरज असताना महायुतीला अधिक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मविआच्या वाट्याला केवळ एकच जागा येण्याची शक्यता असल्याने त्या जागेसाठी योग्य उमेदवार निवडणे आघाडीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे, भाजपकडूनही संभाव्य उमेदवारांची नावे समोर येत आहेत. भाजपकडून राम सातपुते, संदीप जोशी, केशव उपाध्ये, माधवी नाईक आणि रणजितसिंह निंबाळकर यांसारख्या नावांची चर्चा सुरू आहे. एकूणच, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असताना मविआसमोरील पेच अधिकच गडद होत आहे.
भाजपकडून अंतिम संधी कुणाला ?
भाजपने संभाव्य 30 उमेदवारांची यादी दिल्लीत पाठवली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः दिल्लीला रवाना झाले आहेत. तेथे केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा करून अंतिम पाच उमेदवारांची नावे निश्‍चित केली जाणार आहेत. या संभाव्य उमेदवारांमध्ये माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे आणि संजय भेंडे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, अंतिम संधी कोणाला मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS