Homeताज्या बातम्या

आता ठाकरेंचे आमदार फूटणार : मंत्री पाटील

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात ठाकरे गटातील सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. ऑपरेशन टायगर यशस

अशोक खरातला 39 आमदार भेटून गेले, मग माझेच नाव का?माजी मंंत्री दीपक केसरकर यांचा संतप्त सवाल
आ. शिवतारेंना मुलीने किडनी दान देत दिले नवजीवन
तटकरे, पटेल यांना सूचक इशारा!


मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात ठाकरे गटातील सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गटात फूट पडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता ठाकरेंचे आमदार फूटणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असून, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केेलेल्या सूचक वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांना वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही आमदार सत्ताधारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले की, थोडा संयम ठेवा. केवळ चौदा नव्हे, त्यापेक्षाही अधिक आमदार आमच्यासोबत येतील. घडामोडींना योग्य वेळ लागतो आणि ती वेळ जवळ आली आहे. राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या तथाकथित मोहिमेबाबत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचाही उल्लेख केला. एकनाथ शिंदे फार बोलत नाहीत. ते शांतपणे परिस्थितीचा विचार करतात आणि योग्य क्षणी निर्णय घेतात. त्यांच्या या स्वभावाची दखल विरोधकांनीही घेतली आहे, असे ते म्हणाले. ठाकरे गटातून काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. या दौर्‍याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. नेत्यांनी जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये फिरलेच पाहिजे. संघटना टिकवण्यासाठी नेतृत्वाला स्वतः मैदानात उतरावे लागते, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. अलीकडेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील यांचा पत्रकारांशी वाद झाल्याचा एक चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर त्यावरही गुलाबराव पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, पत्रकार हे लोकशाही व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. ते समाजाचा आरसा असतात. त्या आरशावर दगड फेकण्याचे काम कुणीही करू नये. मतभेद होऊ शकतात, वादविवादही होतात; मात्र शिवीगाळ किंवा आक्रमक वर्तन योग्य ठरत नाही. यापुढे अशा घटना टाळल्या पाहिजेत, असा सल्ला आपण संबंधितांना देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चूक झाल्यास दिलगिरी व्यक्त करण्यात कमीपणा नसतो. क्षमा मागणे हे शौर्याचे लक्षण मानले गेले आहे, असे सांगत त्यांनी संयम आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. राज्यातील या घडामोडींमुळे आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विविध पक्षांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS