आ. शिवतारेंना मुलीने किडनी दान देत दिले नवजीवन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. शिवतारेंना मुलीने किडनी दान देत दिले नवजीवन

मुंबई : शिंदे गटाचे पुरंदर मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर सोमवारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. दीर्घकाळ गंभ

पळवापळवीतून सत्तेचे व्यवस्थापन करणे हा जनताद्रोहच!
डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार; राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरव
तटकरे, पटेल यांना सूचक इशारा!
The current image has no alternative text. The file name is: image.png

मुंबई : शिंदे गटाचे पुरंदर मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर सोमवारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. दीर्घकाळ गंभीर मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या शिवतारे यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांना नियमित डायलिसिस घ्यावे लागत होते. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी पुढाकार घेत स्वतःची किडनी वडिलांना दान करण्याचा निर्णय घेतला आणि या त्यागातून वडिलांना नवजीवन मिळाले.
गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या उपचारांनंतर अखेर ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. संबंधित वैद्यकीय पथकाच्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर विजय शिवतारे आणि ममता शिवतारे या दोघांचीही प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरळीत सुरू आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कुटुंबीय, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. या घटनेला आणखी भावनिक पैलू मिळाला तो म्हणजे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी व्यक्त केलेल्या भावना. ममता शिवतारे या त्यांच्या पत्नी असून, त्यांनी सामाजिक माध्यमांवर आपल्या पत्नीच्या धाडसी निर्णयाबद्दल मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया दिली आहे. लांडे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, आयुष्यात अनेक संकटांना सामोरे गेलो, अनेक कठीण प्रसंग पाहिले; मात्र पत्नीने घेतलेल्या या एका निर्णयाने अंतर्मन ढवळून निघाले. वडिलांना नवजीवन देण्यासाठी तिने घेतलेला निर्णय केवळ कर्तव्य नव्हे, तर निःस्वार्थ प्रेमाचे सर्वोच्च उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांपासून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासण्या, कागदपत्रांची पूर्तता आणि कायदेशीर प्रक्रिया ममता यांनी स्वतःच्या जबाबदारीवर पूर्ण केल्या. त्या सर्व प्रक्रियेत आपण फक्त साक्षीदार होतो, अशी कबुली देत त्यांनी पत्नीच्या धैर्याचे कौतुक केले. देव मुलगी का देतो, याचे उत्तर आज मिळाले, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आयसीयूमध्ये पत्नीच्या शेजारी बसून तिच्याकडे पाहताना भावना आवरत नसल्याचेही त्यांनी सांगितले. नात्यांच्या कसोटीच्या क्षणी अनेकजण साथ सोडतात; मात्र मुलगी आणि कुटुंबीयांचे नाते निःस्वार्थ असते, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या घटनेने समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे. अवयवदानाबाबत अजूनही अनेक गैरसमज आणि भीती आहेत; मात्र ममता शिवतारेंच्या या निर्णयामुळे अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. कुटुंबासाठी, विशेषतः पालकांसाठी मुलांनी केलेला त्याग किती मोठा असू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अशा शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत, तर दुसरीकडे मानवी नात्यांतील संवेदनशीलता आणि त्याग यांचेही दर्शन या घटनेतून घडले. ममता शिवतारेंच्या निर्णयामुळे मुलगी ही देवाची सर्वात मोठी देणगी असल्याची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

COMMENTS