Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरातला 39 आमदार भेटून गेले, मग माझेच नाव का?माजी मंंत्री दीपक केसरकर यांचा संतप्त सवाल

मुंबई : भोंदूपणाच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट

मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चाला सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबामोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन-डॉ.गणेश ढवळे
सा. बां. खात्याचे दरोडेखोर अ.गायकवाड, चव्हाण, घरत, प्र.‌गायकवाड
संजीवनी फार्मसीच्या १२ विद्यार्थ्यांना नोकरी 

मुंबई : भोंदूपणाच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. खरातला अनेक लोक, जवळपास 39 आमदार भेटून गेले, मग केवळ माझेच नाव का घेतले जाते? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. केसरकर म्हणाले की, ईशान्येश्‍वर मंदिरात त्यांनी फक्त एकदाच पूजा केली असून त्या निमित्तानेच खरात यांची ओळख झाली. मी देवभक्त आहे. शिर्डीला जाताना वाटेत येणार्‍या मंदिरात दर्शनासाठी थांबणे ही माझी वैयक्तिक श्रद्धा आहे. त्यातून ओळख झाली म्हणून कोणाच्या चुकीच्या कृत्यांशी माझा संबंध जोडणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
खरातच्या कथित गैरप्रकारांबाबत बोलताना केसरकर यांनी ठाम भूमिका मांडली. जर त्याने काही चुकीचे केले असेल, तर त्याला कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे. त्याला वाचवण्यासाठी माझ्याकडून कोणताही प्रयत्न झालेला नाही. असा कोणताही फोन गेला असेल तर मी दोषी ठरेन, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, खरातच्या भोंदूपणाची कल्पना त्यांना कधीच आली नाही. मी मंत्री असतानाही तेथे गेलो होतो. माझ्यासोबत सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसही असायचे. त्यांनाही याबाबत काहीच माहिती नव्हती. अन्यथा त्यांनी मला नक्कीच सावध केले असते, असे ते म्हणाले. केसरकर यांनी याही गोष्टीचा इन्कार केला की खरात यांचा त्यांच्या शासकीय कामकाजाशी काहीही संबंध होता. माझ्या खात्याशी त्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. केवळ ओळखीचे काही फोटो किंवा भेटी यावरून चुकीचे निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक आहे. मी श्रद्धाळू आहे, पण अंधश्रद्धेला कधीही समर्थन देत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी काही वृत्तांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दाव्यांचे खंडन केले.

COMMENTS