Homeताज्या बातम्या

सोनखेड पेट्रोल पंपावरील खूनप्रकरण उघड; 12 तासांत दोन्ही आरोपी जेरबंदरेल्वे स्थानकातून पलायनाच्या तयारीत असताना पोलिसांचा सापळा; तात्काळ कारवाईमुळे सामाजिक सलोखा अबाधित

नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड येथील मोरगे पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून प्लंबर किफायत अली खाजा मोईनुद्दीन यांच्या निर्घृण खूनप्रकरणातील दोन्ही

पत्त्याच्या डावावरील पैशांच्या उधारीतून खून; हदगाव तालुक्यातील निवघा गावात तरुणाची हत्या, मित्र गंभीर जखमी
नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई; लातूर आणि नांदेड जिल्ह्यात धाडी टाकून १ कोटी ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुटखा-पानमसाला, खाद्यतेल अन् बेकरी उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; नांदेड जिल्ह्यातील अनेक पेढ्या सील

नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड येथील मोरगे पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून प्लंबर किफायत अली खाजा मोईनुद्दीन यांच्या निर्घृण खूनप्रकरणातील दोन्ही आरोपींना नांदेड पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक करून गुन्ह्याचा छडा लावला आहे. नांदेड रेल्वे स्थानक परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना बालाजी शिवाजी मोरे आणि पवन चौधरी या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनखेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले.
पीरबुर्‍हाण नगर, नांदेड येथील रहिवासी किफायत अली खाजा मोईनुद्दीन हे प्लंबिंगचे काम करीत होते. 10 जून रोजी ते सोनखेड येथील मोरे पेट्रोल पंपावर कामासाठी गेले असताना दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी पेट्रोलबाबत विचारणा केली. आपण केवळ प्लंबिंगचे काम करीत असून पेट्रोलबाबत कर्मचार्‍यांना विचारावे, असे उत्तर दिल्याने आरोपी संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी तेथील काही कर्मचार्‍यांशी वाद घालत मारहाण सुरू केली. हा वाद मिटविण्यासाठी किफायत अली पुढे आले असता, आरोपींनी लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर प्रहार केले. लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच सोनखेडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व विविध पोलिस पथकांनी रात्रभर शोधमोहीम राबविली. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. दरम्यान, आरोपी नांदेड रेल्वे स्थानक परिसरात असून रेल्वेने पलायन करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या पथकासह एपीआय भागवत नागरगोजे यांच्या पथकाने रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मयत आणि आरोपी हे भिन्न समाजातील असल्याने या घटनेनंतर समाजमाध्यमांवर विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि आरोपींना त्वरित अटक झाल्याने संभाव्य सामाजिक तणाव टाळण्यात यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले, सोनखेडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व सोनखेड पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संयुक्त पथकाने केली. सोनखेड पोलिस ठाण्यात रुजू झाल्यानंतर एपीआय भागवत नागरगोजे यांनी पहिल्याच गंभीर गुन्ह्यात दाखविलेली तत्परता व तपासातील कौशल्यामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS