Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिकविमा भरपाई मिळण्यासाठी मतदारसंघात पाहणी सुरु ः आ.काळे

जिल्हाधिकारी सालिमठ यांनी गांभीर्याने दखल घेत कार्यवाहीला प्रारंभ

कोपरगाव /प्रतिनिधी : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना पिकविमा भरपाई मिळावी. यास

पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू
कोपरगावात दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाहणी सुरू करा
15% लाभांश देण्याची परंपरा याहीवर्षी अबाधित : आ.काळे

कोपरगाव /प्रतिनिधी : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना पिकविमा भरपाई मिळावी. यासाठी आ.आशुतोष काळे यांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांची भेट घेवून कोपरगाव मतदारसंघात दुष्काळाची पाहणी करावी. अशी मागणी केली होती. त्या मागणीची जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेतल्यामुळे बुधवार (दि.23) पासून कोपरगाव मतदारसंघात दुष्काळाची पाहणी सुरु झाली.अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
चालू वर्षी खरीप हंगामात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात शेतकर्‍यांनी बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग आदी पिकांच्या पेरण्या केल्या. मात्र मागील 25 दिवसांपासून कोपरगाव मतदारसंघाकडे पावसाने पूर्णत: पाठ फिरविल्यामुळे खरीपाची पिके जळून चालली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हातातून जात असून संपूर्ण मतदारसंघात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या नुकसानीची पाहणी करावी. शेतकर्‍यांना लवकरात लवकर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी आ. आशुतोष काळे यांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांची भेट घेवून कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तातडीने पाहणी सुरू करण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार कोपरगाव मतदारसंघात पावसाने उघडीप दिल्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची  प्रशासनाकडून पाहणी केली जाणार आहे. या पाहणी दरम्यान सर्व शेतकर्‍यांनी झालेल्या पिकांचे नुकसान पाहणी करणार्‍या पथकाच्या निदर्शनास आणून द्यावेत असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे

COMMENTS