Homeमहाराष्ट्र

सासरच्या छळाला कंटाळून देवळाली प्रवरा येथील विवाहितेची पुण्यात आत्महत्या; पतीसह दोघे गजाआड

देवळाली प्रवरा : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून देवळाली प्रवरा (माहेर) येथील २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊ

 सोमैया महाविद्यालयाच्या 259 विद्यार्थ्यांना नोकऱ्या
डॉ. प्रशांत मुरूमकर यांची प्रतिष्ठित वैज्ञानिक सल्लागार मंडळात नियुक्ती
पुस्तके हाती-माथी जपली पाहिजेत : प्रा. तुळे
Yavat Crime : दोन मटका चालकांच्या जाहीर हाणामारीने यवतचे अवैध धंदे  चव्हाट्यावर ; पोलिसांची हाताची घडी तोंडावर बोट..! - Pune Prime News

देवळाली प्रवरा : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून देवळाली प्रवरा (माहेर) येथील २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील डाळिंब येथे घडली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पतीसह सहाजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पती व दिराला अटक केली आहे.

वैष्णवी अजिंक्य कांबळे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई आशा संतोष साबळे (रा. देवळाली प्रवरा) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा विवाह १५ जून २०२२ रोजी डाळिंब येथील अजिंक्य कांबळे याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत चालला, मात्र पतीला दारूचे व्यसन लागल्यानंतर कौटुंबिक वाद सुरू झाले. लग्नात अपेक्षेप्रमाणे वस्तू आणि पैसे मिळाले नसल्याचा ठपका ठेवत पतीकडून तिला वारंवार मारहाण व मानसिक छळ केला जात होता. ८ जून रोजी सायंकाळी वैष्णवीने आईशी फोनवर संपर्क साधून सासरी होणाऱ्या त्रासाची व्यथा मांडली होती. त्यानंतर पती, सासू, सासरे आणि दिराने तिला बेदम मारहाण केली, ज्यात ती बेशुद्ध पडली होती. ९ जून रोजी सकाळी आई आशा साबळे या मुलीला भेटण्यासाठी निघाल्या असतानाच जावई अजिंक्य कांबळे याने फोन करून वैष्णवीने गळफास घेतल्याची माहिती दिली. यवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

COMMENTS