Homeताज्या बातम्या

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल अन् बेकरी उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; नांदेड जिल्ह्यातील अनेक पेढ्या सील

नांदेड : सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन (FDA) नांदेडच्या वतीने ज

पाटोदा पोलिसांकडून 14.80 लाखांचा गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थ नष्ट
विशाल डेअरीवरएफडीएची धडक कारवाई; 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा भेसळयुक्त मिठाई साठा जप्तअस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ निर्मिती; उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित
शालेय पोषण आहारावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई2 शाळांमधून सुमारे 2.34 लाखांचा अन्नसाठा जप्त; नमुने प्रयोगशाळेत, अहवालानंतर होणार कारवाई
Three days of the Food and Drug Administration were raided Gutkha, pan  masala worth Rs 8 lakh | Food and Drug Administration : अन्न व औषध  प्रशासनाच्या तीन दिवस धडक कारवाया; 8

नांदेड : सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन (FDA) नांदेडच्या वतीने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ व इतर अन्नपदार्थांच्या साठ्यांवर छापेमारी करून मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

विविध ठिकाणच्या कारवायांचा तपशील:

  • २९ मे २०२६ (जुना मोंढा, नांदेड): ‘मे. एम.ए. शरीफ’ या दुकानातून संशयास्पद रिफाइंड सोयाबीन तेलाचा (खुले) नमुना घेऊन १ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा ७१८ किलो साठा जप्त करण्यात आला.
  • ३० मे २०२६ (धनेगाव व माहूर): ‘मे. रॉयल बेकरी’ (धनेगाव) मधून २५ हजार ८४० रुपयांचा ‘मिल्क रस्क’ हा मिथ्याछाप अन्नपदार्थ जप्त केला. तर माहूर येथील ‘मे. रहिम किराणा’ दुकानातून ५७ हजार २८० रुपये किमतीचे ३५८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले.
  • हदगाव (कुल्फी नष्ट): ‘मे. भैरूनाथ आईस्क्रीम’मधून अस्वच्छ वातावरण आणि विनापरवाना व्यवसायामुळे ५१ हजार ९०० रुपयांची कुल्फी व मिल्कशेक नष्ट करण्यात आले.
  • ३१ मे २०२६ (गुटखा जप्ती व पेढ्या सील): नांदेड (देगलूरनाका) येथील ‘मे. शोएब पान शॉप’, इस्लापूर (किनवट) येथील ‘मे. दुर्गा पान शॉप’ आणि ‘मे. साईश्रद्धा पान शॉप’वर धाड टाकून प्रतिबंधित गुटखा जप्त केला व ४ जणांवर गुन्हे नोंदवून दुकाने सील केली.
  • २ जून २०२६ (जुना मोंढा व किनवट): ‘मे. जयगोपाल कृष्णकुमार’ दुकानातून कमी दर्जाचे संशयास्पद १ लाख ३ हजार ३४६ रुपयांचे ‘चनाबेसन’ जप्त केले. तसेच किनवटच्या ‘मे. सैफ किराणा’मधून ४७ हजार ४४५ रुपयांचा गुटखा जप्त करून दुकान सील करण्यात आले.

जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून, अहवालानंतर ‘अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६’ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. ही कारवाई सहायक आयुक्त संजय चट्टे, रा. मा. भरकड आणि सह आयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे यांच्या पथकाने पूर्ण केली.

COMMENTS