कोपरगाव :“सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार युतीधर्म पाळत थांबावे लागले. त्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख समितीने विधानपरिषदेवर काम करण्याची संधी दिली. शिर्डीच्या साईबाबांच्या भूमीतून आलो असल्याने ही संधी म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचे फळ असल्याची भावना आहे,” असे प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी केले.मुंबई येथील विधान भवनात गुरुवारी (दि. १४ मे) विवेक कोल्हे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पक्षाच्या प्रमुख समितीचे आभार मानले.पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, “सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी गेली ९३ वर्षे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य केले. मंत्री म्हणूनही त्यांनी राज्याची सेवा केली. त्यांचा वारसा बिपीन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुढे चालविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.”ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या प्रकल्पाला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. “सध्या १९० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. हे पाणी योग्य पद्धतीने वळविल्यास अहिल्यानगर, नाशिक आणि मराठवाडा दुष्काळमुक्त होण्यास मोठी मदत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून तो पूर्णत्वास नेण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करण्यात येतील,” असेही कोल्हे यांनी नमूद केले.शपथविधी सोहळ्यास स्व. शंकरराव कोल्हे यांच्यासोबत कार्य केलेले अनेक ज्येष्ठ सहकारी उपस्थित होते. तसेच दिवंगत सहकाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी विवेक कोल्हे यांनी गांधी टोपी परिधान करून आदरांजली अर्पण केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विवेक कोल्हे यांच्यावरचे विशेष प्रेम या व्हिडिओ व फोटोतून अधोरेखित झाले. कोल्हे यांच्या खिशाला विधान परिषद सदस्याचा बॅच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लावला आणि या दृश्यामुळे उपस्थित सर्वांमध्ये एक वेगळे ऋणानुबंध मुख्यमंत्री आणि विवेक कोल्हे यांच्यातील समोर आले.एका कर्तुत्ववान आणि दूरदृष्टीच्या युवा चेहऱ्याला मुख्यमंत्री फडणवीस कशी ताकद देतात आणि ते किती आत्मीयतेने त्या नेतृत्वाला घडवतात याचा प्रत्यय आला. कोपरगाव मतदार संघात जल्लोष हजारो कार्यकर्त्यांनी या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोपरगाव येथे पाहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील विवेक कोल्हे या भाजपाने दिलेल्या सर्वाधिक तरुण चेहऱ्याची चर्चा विधान भवनात शपथविधी सोहळ्यात रंगली होती. कमी वयात अनेक धाडसी राजकीय निर्णय आणि अभ्यासू दूरदृष्टीची कार्यशैली विवेक कोल्हे यांचे कौतुकात भर घालत होती. दरम्यान त्यांनी शपथ घेताच कोपरगाव मतदार संघात जल्लोष करण्यात आला.

कोपरगाव :“सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार युतीधर्म पाळत थांबावे लागले. त्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख समितीने विधानपरिषदेवर काम करण्याची संधी दिली. शिर्डीच्या साईबाबांच्या भूमीतून आलो असल्याने ही संधी म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचे फळ असल्याची भावना आहे,” असे प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी केले.मुंबई येथील विधान भवनात गुरुवारी (दि. १४ मे) विवेक कोल्हे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पक्षाच्या प्रमुख समितीचे आभार मानले.पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, “सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी गेली ९३ वर्षे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य केले. मंत्री म्हणूनही त्यांनी राज्याची सेवा केली. त्यांचा वारसा बिपीन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुढे चालविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.”ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या प्रकल्पाला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. “सध्या १९० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. हे पाणी योग्य पद्धतीने वळविल्यास अहिल्यानगर, नाशिक आणि मराठवाडा दुष्काळमुक्त होण्यास मोठी मदत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून तो पूर्णत्वास नेण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करण्यात येतील,” असेही कोल्हे यांनी नमूद केले.शपथविधी सोहळ्यास स्व. शंकरराव कोल्हे यांच्यासोबत कार्य केलेले अनेक ज्येष्ठ सहकारी उपस्थित होते. तसेच दिवंगत सहकाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी विवेक कोल्हे यांनी गांधी टोपी परिधान करून आदरांजली अर्पण केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विवेक कोल्हे यांच्यावरचे विशेष प्रेम या व्हिडिओ व फोटोतून अधोरेखित झाले. कोल्हे यांच्या खिशाला विधान परिषद सदस्याचा बॅच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लावला आणि या दृश्यामुळे उपस्थित सर्वांमध्ये एक वेगळे ऋणानुबंध मुख्यमंत्री आणि विवेक कोल्हे यांच्यातील समोर आले.एका कर्तुत्ववान आणि दूरदृष्टीच्या युवा चेहऱ्याला मुख्यमंत्री फडणवीस कशी ताकद देतात आणि ते किती आत्मीयतेने त्या नेतृत्वाला घडवतात याचा प्रत्यय आला.
कोपरगाव मतदार संघात जल्लोष
हजारो कार्यकर्त्यांनी या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोपरगाव येथे पाहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील विवेक कोल्हे या भाजपाने दिलेल्या सर्वाधिक तरुण चेहऱ्याची चर्चा विधान भवनात शपथविधी सोहळ्यात रंगली होती. कमी वयात अनेक धाडसी राजकीय निर्णय आणि अभ्यासू दूरदृष्टीची कार्यशैली विवेक कोल्हे यांचे कौतुकात भर घालत होती. दरम्यान त्यांनी शपथ घेताच कोपरगाव मतदार संघात जल्लोष करण्यात आला.

COMMENTS