Homeताज्या बातम्याअहमदनगर

यशवंत विद्या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. पवार तर शेळके उपाध्यक्ष

 श्रीगोंदा : श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील नोकरदारांची यशवंत विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित, श्रीगोंदा यांच्या अध्यक्षपदी प्रा. नंदकुमार प

कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे
सुपा येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसे आक्रमकउड्डाणपुलासह सिग्नलची मागणी ; सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन
 विश्वनाथ गाढे यांचे निधन

 श्रीगोंदा : श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील नोकरदारांची यशवंत विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित, श्रीगोंदा यांच्या अध्यक्षपदी प्रा. नंदकुमार पवार तर उपाध्यक्षपदी शहाजी शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन तथा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. श्रीगोंदा तालुका सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक नारायण परजणे यांनी अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहत दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.संचालक मंडळाच्या बैठकीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, सहकार खात्याचे अधीक्षक निलेश मुंडे, संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.या निवडीबद्दल राजेंद्र दादा नागवडे, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, माजी व्हॉईस चेअरमन तथा विद्यमान संचालक सुभाष शिंदे, प्रा. सुरेश रसाळ, प्रा. सुनील माने तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त, संचालक मंडळ, प्राध्यापक, शिक्षक व सेवकवृंद यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS