सोनई : प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी गुरुवारी (दि. १४) दुपारी शनिशिंगणापूर येथे येऊन शनिदर्शन घेतले. शनि जयंती आणि शनी अमावस्या एकत्र आल्याने शनिदर्शनाची इच्छा झाल्याने तत्काळ शनिशिंगणापूरला आल्याचे त्यांनी सांगितले.दुपारी दोनच्या सुमारास त्या शनिशिंगणापूर येथे दाखल झाल्या. यावेळी त्यांनी दहा किलो तेल अर्पण करून चौथऱ्याखालून शनिदर्शन घेतले. त्यानंतर शनैश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “शनिदेवावरील भजने आणि गीते यांची ध्वनिमुद्रिका तसेच ‘सूर्यपुत्र शनिदेव’ या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी स्व. बाबुराव बनकर यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या चित्रपटाची निर्मिती शक्य झाली. शनिशिंगणापूरला प्रसिद्धी मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.”यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील सायराम बनकर आदी उपस्थित होते. देवस्थानतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती अतुल चोरमारे यांनी दिली. ही माहिती ऐकून समाधान वाटल्याची भावना अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली. अनुराधा पौडवाल या १९९१ पासून शनिशिंगणापूर येथे येत आहेत. मात्र त्यांनी कधीही चौथऱ्यावर जाण्याचा आग्रह धरला नाही.

COMMENTS