Homeताज्या बातम्याअहमदनगर

ओमकारचा अपघाती मृत्यू की घातपात?न्याय मिळवून देण्यासाठी आजोबांची आर्त हाकमृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणत आंदोलन

Oplus_16908288 राहाता : राहाता शहरातील 13 वर्षीय ओमकार गायकवाड या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आपल्या आजीसोबत ‘ड

सुरत-चेन्नई महामार्गग्रस्त शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा; बाळासाहेब थोरातांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना ‘साने गुरुजी जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
बहुजन समता पार्टीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी दिगंबर खुडे यांची नियुक्ती
Oplus_16908288


राहाता : राहाता शहरातील 13 वर्षीय ओमकार गायकवाड या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आपल्या आजीसोबत ‘डफ’चा खेळ पाहण्यासाठी गेलेल्या ओमकारला भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. एवढ्यावरच न थांबता वाहन चालकाने गाडी पुन्हा मागे घेत त्याच्या अंगावरून चालविल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी ओमकारचा मृतदेह राहाता पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन केले.
ओमकारचे आजोबा पांडुरंग गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ओमकारची आजी शनी चौक परिसरात ‘डफ’चा खेळ पाहण्यासाठी जात होती. ओमकारही त्यांच्या मागून निघाला होता. कृष्ण मंदिराजवळील रणभोर यांच्या घरासमोर वळत असताना भरधाव वेगातील इरटीगा वाहनाने प्रथम आजीला धडक दिली. त्यानंतर ओमकारला जोरदार धडक देत काही अंतरावर फेकले. घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ओमकार खाली पडल्यानंतर वाहन चालकाने गाडी पुन्हा मागे-पुढे घेत त्याच्या पोटावरून चाक फिरवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकारात ओमकार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शिर्डी येथील साई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. तेथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. काही प्रतिष्ठित नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची गंभीरता लक्षात आणून दिली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संतप्त ग्रामस्थ आणि ओमकारच्या नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ओमकारचा मृतदेह रुग्णवाहिकेतून राहाता पोलीस ठाण्यासमोर आणला. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते. यावेळी पांडुरंग गायकवाड आणि आशा गायकवाड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, आमचे कोणाशीही वैर नाही. आम्ही सामान्य कुटुंबातील लोक आहोत. मात्र ज्या पद्धतीने वाहन पुन्हा अंगावरून घालण्यात आले, त्यातून हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा संशय येतो. आमच्या नातवाचा काय गुन्हा होता? आम्हाला फक्त न्याय हवा आहे. ओमकार हा कुटुंबातील एकुलता एक नातू असल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे चित्र दिसून आले.
कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह
राहाता शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. ओमकार आणि त्याच्या आजीला धडक दिल्यानंतर वाहन पुन्हा अंगावरून चालविल्याचा आरोप होत असताना, पोलिसांनी सुरुवातीला तत्पर कारवाई का केली नाही, असा प्रश्‍न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS