Homeताज्या बातम्याअहमदनगर

राहाता-शिर्डी जनगणना प्रशिक्षणाची सांगता

श्रीरामपूर: भारताची 16 वी आणि जगातील सर्वात मोठ्या पहिल्या डिजिटल जनगणना राहाता शिर्डी परिसरात प्रशिक्षणाची नुकतीच सांगता झाली. देश पातळीवरील सर्

राहुरीत श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे रविवारी आगमन; महाआरती व भव्य मिरवणुकीचे आयोजन
सरसेनापती माणकोजी दहातोंडेंवर येणार पहिला पोवाडा; शिवशाहीर अक्षय डांगरे करणार सादरीकरण
‘एसएसजीएम’मध्ये माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक उत्साहात; आमदार विवेक कोल्हे यांच्यासह मान्यवरांचे अभिनंदन


श्रीरामपूर: भारताची 16 वी आणि जगातील सर्वात मोठ्या पहिल्या डिजिटल जनगणना राहाता शिर्डी परिसरात प्रशिक्षणाची नुकतीच सांगता झाली. देश पातळीवरील सर्वात मोठ्या असलेल्या जनगणना प्रशिक्षणाची सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यात राहता शिर्डी परिसरात 26 एप्रिल ते 8 मे या कालावधीत शिर्डी संस्थानच्या निमगाव कोर्‍हाळे येथील साईबाबा संकुल महाविद्यालयात झाली. हे जनगणना प्रशिक्षण राहाता तालुक्याचे तहसीलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुका व राहाता, शिर्डी शहर परिसरासाठी घेण्यात आले.
राहाता ग्रामीण प्रशिक्षणासाठी नायब तहसीलदार हेमंत पाटील आणि राहाता शहर प्रशिक्षणासाठी राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे व शिर्डी शहरसाठी दिघे साहेब यांनी चार्ज अधिकारी म्हणून काम पाहिले. जनगणने अंतर्गत 1 ते 15 मे या कालावधीत सर्व नागरिकांनी आपल्या घरगणनेची स्वगणना करून घ्यायची आहे. तर 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणकामार्फत या परिसरात प्रगणना होणार आहे. या कामासाठी एकूण 410 घरयादी गट तयार करून यामध्ये 451 प्रशिक्षक आणि 76 पर्यवेक्षकांमार्फत हे जनगणनेचे काम परिसरात पूर्ण केले जाणार आहे. राहाता तालुक्याचे ग्रामीण जनगणनेचे चार्ज अधिकारी तहसीलदार अमोल मोरे व अतिरिक्त चार्ज अधिकारी निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या प्रशिक्षणाची नुकतीच सांगता झाली. यावेळी प्रशिक्षणासाठी अरुण मोकळ, अनमोल होन, विजय देशमुख, अण्णासाहेब पडवळ, नानासाहेब राजभोज, प्राचार्य विकास शिवगजे, किरणकुमार अरगडे, सुरेखा जोगदंडकर यांनी क्षेत्रीय प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी अतिरिक्त चार्ज अधिकारी निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील, मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी आपल्या मनोगतातून जनगणना यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तर डॉ. शरद दुधाट यांनी जनगणना प्रशिक्षणाचे अनुभव व्यक्त केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी गणेश साबळे, महेश कालेकर, प्रमोद घाणे, कृष्णा पोटे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अनमोल होन यांनी केले.

COMMENTS