Homeताज्या बातम्याअहमदनगर

कृषि संशोधन केंद्राच्या रोपवाटीकेस दोन तारांकन दर्जा

देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गणेशखिंड, पुणे येथील विभागीय कृषि संशोधन केंद्राच्या रोपवाटीकेस भारत सरकारच्या राष्ट

आश्वी बुद्रुक येथे प्रवरेच्या कृषीदूतांचे उत्साहात स्वागत; शेतकऱ्यांना करणार आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
सात्रळ येथे प्रवरेच्या कृषिकन्यांचे आगमन
नैसर्गिक शेतीसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल उपयुक्त : कुलगुरू डॉ. विलास खर्ची


देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गणेशखिंड, पुणे येथील विभागीय कृषि संशोधन केंद्राच्या रोपवाटीकेस भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी बोर्डामार्फत दोन तारांकन दर्जा प्रदान करण्यात आला आहे. ही मान्यता सन 2026-27 व 2027-28 या दोन वर्षांसाठी लागू राहणार आहे.
राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या समितीने रोपवाटीकेस प्रत्यक्ष भेट देऊन विविध फळझाडांचे मातृवृक्ष प्लॉट, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, पाणीपुरवठा सुविधा तसेच कलमे व रोपांची पाहणी केली. रोपवाटीकेतील मातृवृक्ष, मूलभूत सुविधा व गुणवत्तापूर्ण रोपे पाहून समितीने समाधान व्यक्त करत दोन तारांकन दर्जाची मान्यता दिली. गणेशखिंड येथील रोपवाटीकेत आंबा, पेरू, सीताफळ, डाळिंब, लिंबू व चिकू आदी फळझाडांची मोठ्या प्रमाणावर कलमे तयार करून शेतकर्‍यांना नियमित पुरवठा केला जातो. सध्या या फळझाडांची कलमे विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. रोपवाटीकेस दोन तारांकन दर्जा प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे व उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील यांनी विभागीय संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुभाष भालेकर, रोपवाटिका प्रमुख डॉ. बी. व्ही. गोंधळी तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले.

COMMENTS