Homeताज्या बातम्या

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना ‘साने गुरुजी जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

संगमनेर : पुरोगामी विचारांचे पाईक, जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक तथा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना राष्ट्रसेवा दलाच्या व

देशात भ्रष्टाचारामुळे मोठी अराजकता; काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका; संगमनेरच्या सहकार पंढरीला भेट
पुणतांबा येथील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधी द्या
पुरोहितांनी गावाला जेऊ घातला ‘धोंडा’; गुहा येथे धार्मिक एकात्मतेचा अनोखा संदेश

संगमनेर : पुरोगामी विचारांचे पाईक, जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक तथा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना राष्ट्रसेवा दलाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘साने गुरुजी जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथे आयोजित एका विशेष समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.

डॉ. सुधीर तांबे हे संगमनेरमधील नामवंत ‘एम.एस. सर्जन’ (M.S. Surgeon) असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच संगमनेरचे नगराध्यक्षपद सांभाळत नगरपालिकेला एक नवी दिशा दिली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकार, समाजकारण, राजकारण व शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. निरोगी समाज निर्मितीसाठी त्यांनी ‘जयहिंद युवा मंच’ची स्थापना केली, तसेच मतिमंद व मूकबधिर मुलांसाठी ‘संग्राम विद्यालया’च्या माध्यमातून मोठे कार्य उभे केले.

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या याच भरीव कामाची दखल घेत उत्तर महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पदवीधर मतदारसंघातून सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने विधान परिषदेवर निवडून दिले होते. आमदार म्हणून त्यांनी शिक्षक, कृषी, सहकार, वकील, डॉक्टर आणि बेरोजगार पदवीधरांचे प्रश्न हिरीरीने मांडले. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेऊनच राष्ट्रसेवा दलाने त्यांना हा सर्वोच्च सन्मान जाहीर केला आहे. डॉ. सुधीर तांबे यांना हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS