Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळा धरणाचे पाणी नगरला देण्यास विरोध ः खंडागळे

बेलापूर प्रतिनिधी ः मुळा नदीवरील मुळा धरण हे गोदावरी खोर्‍यात येते तर नगर शहर हे कृष्णा खोर्‍यात येते. गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असल्याने तुटीच

गडहिंग्लज -चंदगड रोडवर भीषण अपघात! | माझं गावं माझी बातमी | LokNews24 |
ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट
जलयुक्त शिवारातून शेतकर्‍यांचे सक्षमीकरण

बेलापूर प्रतिनिधी ः मुळा नदीवरील मुळा धरण हे गोदावरी खोर्‍यात येते तर नगर शहर हे कृष्णा खोर्‍यात येते. गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असल्याने तुटीच्या खोर्‍यातील मुळा धरणाचे पाणी विपुल अशा कृष्णा खोर्‍यातील नगर शहर व तालुक्याला देणे अन्यायाचे ठरणार असल्याने या मागणीस आमचा विरोध असल्याचे बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी स्पष्ट केले. खंडागळे म्हणाले की, मुळा धरणाचे पाणी नगर, पाथर्डी व शेवगाव तालुक्यांना मिळावे आशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी कामगार मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी केली आहे.सदर मागणी हि मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांसाठी अन्यायाची आहे. मुळात मुळा धरण ज्या गोदावरी खोर्‍यात येते ते गोदावरी खोरे वर्गीकरणानुसार तुटीचे खोरे आहे. या खोर्‍यात समन्यायी पाणी वाटप कायद्यावरुन अगोदरच असंतोष आहे.त्यात मुळा धरणाचे पाणी कृष्णा खोर्‍यातील नगर तालुक्यास देणे हे आगीत तेल ओतणे ठरणार असल्याचे श्री.खंडागळे म्हणाले. पाथर्डी व शेवगाव तालुके गोदावरी खोर्‍यात येतात त्याबाबत प्रश्‍न नाही.तथापि,नगर शाहर व तालुका हा कृष्णा खोर्‍यात येतो.कृष्णा खोरे हे वर्गीकरणानुसार विपुल खोरे आहे.याचा अर्थ या खोर्‍यात प्रचंड पाणी उपलब्ध आहे.त्यामुळे नगर तालुक्यासाठी कृष्णा खो-यातूनच पाणी उपलब्ध करणे न्याय्य ठरेल. यादृष्टीने कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना तातडीने पूर्ण करावी.तसेच या स्थिरीकरणातून उजनी धरणांस उपलब्ध होणारे पाणी सिना प्रकल्पात आणून तेथून बक वाटरवर उपसा सिंचन पध्दतीने नगर शहर व एम.आय.डी.सी, सुपा एम.आय.डी.सी. तसेच नगर तालुक्याला पाणी उपलब्धता करावी अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे. गोदावरी खोर्‍यातील जनतेने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष ठेवून दक्ष राहावे असे आवाहनही  खंडागळे यांनी केली आहे.

COMMENTS