Homeताज्या बातम्या

बहुजन समता पार्टीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी दिगंबर खुडे यांची नियुक्ती

श्रीगोंदा : बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या हस्ते शेडगाव

पुढच्या १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची चौंडीत मोठी घोषणा
शेवगावात हिंदू जनआक्रोश मोर्चा; अत्याचार प्रकरणाचा निषेध करत अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय देण्याची मागणी
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार आशुतोष काळेंकडून जोरदार स्वागत

श्रीगोंदा : बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या हस्ते शेडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर रमेश खुडे यांची बहुजन समता पार्टीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र दि. २९ मे २०२६ रोजी प्रदान करण्यात आले.

दिगंबर खुडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे श्रीगोंदा तालुक्यात पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, इतर मागासवर्गीय तसेच उपेक्षित समाजातील महिला आणि सर्व घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय हक्कांसाठी संघर्ष करणे तसेच पक्षाची संघटना गावागावांत मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या नियुक्ती समारंभास पत्रकार अनिल तुपे, तानाजी खुडे, दत्ता रणशिंग, आदेश खुडे, भाऊ खुडे, राम खुडे, अशोक खुडे यांच्यासह ग्रामस्थ आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियुक्तीनंतर दिगंबर खुडे यांनी सांगितले की, श्रीगोंदा तालुक्यात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. आगामी काळात तालुक्यात व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.

COMMENTS