Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई गट शिक्षणाधिकारी पदी भीमाशंकर नांदुरकर यांची नियुक्ती; शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण

गेवराई : पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत असलेल्या गटशिक्षण कार्यालयात कार्यरत असलेले ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर यांची बीड जिल

बीड पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांचा शिक्षक संघाकडून भव्य सत्कार
मोबाइलच्या व्यसनावर पालकांनी नियंत्रण ठेवावेगटशिक्षणाधिकारी शबाना शेख ; रवंदे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
सेवाजेष्ठ शिक्षकांवर समायोजनाचा ‘नवा फॉर्म्युला’?‘53 प्लस’चा आधार घेत जेष्ठांना डावलण्याची चर्चा; शिक्षक संघटनांत संताप

गेवराई : पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत असलेल्या गटशिक्षण कार्यालयात कार्यरत असलेले ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर यांची बीड जिल्हा परिषदेच्या वतीने गेवराई तालुक्याच्या नवीन गट शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश दि. 25 एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आले असून, त्यांनी मावळते गट शिक्षणाधिकारी प्रवीण काळम पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.
भीमाशंकर नांदुरकर हे बीड जिल्ह्यातील रहिवासी असून शिक्षण क्षेत्रात त्यांचा दीर्घ व अनुभवी प्रवास राहिला आहे. त्यांनी यापूर्वी वडवणी, अंबाजोगाई तसेच परळी येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनिक शिस्त, शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि शिक्षकांशी समन्वय या बाबींना विशेष प्राधान्य दिले गेल्याचे सहकारी शिक्षकांकडून सांगितले जाते. शांत, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून नांदुरकर यांची ओळख असून, त्यांच्या नियुक्तीमुळे गेवराई तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शिक्षकांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, गेवराई तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची संख्या मर्यादित असल्याने उपलब्ध मनुष्यबळावरच संपूर्ण शिक्षण विभागाचे कामकाज चालवावे लागते. अशा परिस्थितीत प्रशासनिक शिस्त व समन्वय राखणे हे मोठे आव्हान मानले जाते. तसेच शाळांवर नोकरी न करता गट शिक्षण कार्यालयात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ नियुक्ती ठिकाणी परत पाठविण्याची महत्त्वाची जबाबदारीही नवीन गट शिक्षणाधिकारी नांदुरकर यांच्यावर असणार आहे. गेवराई तालुक्याला अनुभवी व शिस्तप्रिय अधिकारी लाभणे ही आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षक वर्गातून व्यक्त होत असून, त्यांच्या कार्यकाळात तालुक्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS