बीड : बीड पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी मा. भगवानराव सोनवणे यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात भव्

बीड : बीड पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी मा. भगवानराव सोनवणे यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात भव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सिद्धेश्वर माटे, जिल्हाध्यक्ष भगवान पवार, तालुकाध्यक्ष बंडू घोरड, जिल्हा संघटक बप्पासाहेब देवगुडे, कार्यकारी अध्यक्ष सुभाष वीर, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर बिडवे, जिल्हा प्रवक्ते महादेव घोडके, तालुका उपाध्यक्ष जीवन हाडळे तसेच संजय वागुले यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भगवानराव सोनवणे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक संघाच्या वतीने सोनवणे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

COMMENTS