Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवंम प्रतिष्ठानतर्फे डॉ. सुरेश भोसले यांचा कोव्हीड योध्दा आरोग्य पुरस्काराने सन्मान

कराड / प्रतिनिधी : कृष्णा हॉस्पीटलने कोरोना काळात केलल्या अतुलनीय कार्याबद्दल कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांचा घारेवाडीतील

मोकळ्या जागेवर कर लावण्याच्या ठरावाचा तात्काळ अहवाल द्या; कराड पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आयुक्तांचा दणका
पाण्यासाठी वडूजमध्ये नागरिकांचा रास्ता रोको; आठ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत
प्लास्टिकचा कचरा उघड्यावर फेकणार्‍याविरोधात कारवाई करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

कराड / प्रतिनिधी : कृष्णा हॉस्पीटलने कोरोना काळात केलल्या अतुलनीय कार्याबद्दल कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांचा घारेवाडीतील शिवंम प्रतिष्ठानतर्फे कोव्हीड योध्दा आरोग्य सन्मान 2022 देवून जोरहाट-आसाम येथील पद्मश्री जादव पाईंग यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख, अध्यक्ष राहुलकुमार पाटील, विजयालक्ष्मी शेट्टी, विश्‍वस्त, सदस्य, विभाग प्रमुख, तरुण-तरुणी उपस्थित होत्या.
डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा हॉस्पीटलने कोरोना काळात मोठे काम केले. अनेकांचा जीव वाचवण्यास मदत झाली. त्या कामाबद्दल अनेक संस्था, संघटनांनी पुरस्कार देण्यासाठी निमंत्रित केले होते. मात्र, मी कुठेही गेलो नाही. बलशाली भारत घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवंम प्रतिष्ठानचे दिलेले मानपत्र, पुरस्कार मी स्विकारत आहे. प्रतिष्ठानच्या चांगल्या कामासाठी पाठीशी कृष्णा समुह कायम राहिल. बलशाली भारत घडवण्यासाठी तरुण पिढीला सुसंस्कारीत करण्याचे काम शिवंम प्रतिष्ठान इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. ही देशासाठी फार मोठी बाब आहे. कोरोना काळात मोठे भितीचे वातावरण होते. या जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात नव्हते. त्यावेळी पहिल्यांदा 60 बेड कोरोनासाठी उपलब्ध करुन दिले. हॉस्पीटलमार्फत 60 बेडपासून 500 बेड वाढवुन आम्ही वाढवुन रुग्णांना चांगली सेवा दिली. सुरुवातीच्या काळात या आजारामुळे कोणीही एकमेकांच्या संपर्कात येत नव्हते. अशा स्थितीतही हॉस्पीटलमधील सेवकांनी रुग्णांना चांगली सेवा दिली. रुग्णांना सेवा देताना हॉस्पीटलमधील 167 सेवक कोरोना बाधित झाले. तरीही त्यांनी न डगमनगता औषधोपचारानंतर पुन्हा रुग्णांना सेवा दिली. हा संस्कार आम्ही हॉस्पीटलमध्ये रुजवला आहे. विठ्ठल मोहिते यांनी मानपत्राचे वाचन केले.

COMMENTS