Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमती जयश्री सोनकवडे यांना ‘त्या’ व्हिडिओप्रकरणी कायदेशीर नोटीस

मुंबई/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी युटयूब चॅनेलवर केलेल्या एका व्हिडिओमध्ये संबोधी अकादमीच

प्रादेशिक उपायुक्त आणि गृहपालांचा रंगला कलगीतुरा
श्रीमती जयश्री सोनकवडेंसह तीन अधिकार्‍यांवर दखलपात्र गुन्हा दाखल
सचिव भांगे यांचा तो दौरा बेनामी संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी का ?

मुंबई/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी युटयूब चॅनेलवर केलेल्या एका व्हिडिओमध्ये संबोधी अकादमीचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक भीमराव हत्तीअंबीरे यांच्यावर बेछुट आरोप केले होते, याप्रकरणी बाबासाहेब भराडे यांनी हत्तीअंबीरे यांच्यावतीने कायदेशीर नोटीस श्रीमती सोनकवडे यांना पाठवण्यात आली आहे.
या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, भीमराव हत्तीअंबीरे संबोधी अकादमीचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक आहेत. तसेच संपूर्ण  महाराष्ट्र, जालना, परभणी, हिंगोली, वाळूज व नागपूर येथे यांच्या एकूण शैक्षणिक संस्था व क्लासेस आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेवून सन 2018 मध्ये यांच्या महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाद्वारे नागपूर येथे यांना ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. यासोबत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने देखील देश-विदेशात गौरव करण्यात आला आहे. त्यांची प्रतिष्ठा केवळ महाराष्ट्रातच नसून विदेशात देखील आहे. असे असतांना दिनांक 18 जून 2023 रोजी आपण माझ्या पक्षकारास एका खोट्या व बनावट यू-ट्यूबद्वारे व्हिडीओ तयार करून इतर लोकांशी संगनमत करून भीमराव हत्तीआंबिरे यांच्याविरुद्ध खोटे व घाणरडे आरोप व प्रत्यारोप केलेले आहेत. या खोट्या व बनावट व्हिडीओद्वारे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात हत्तीआंबिरे यांना बदनाम करण्यासाठी हा बनावट व्हिडीओ करण्यात आला आहे.

या बनावट व्हिडीओ क्लीपमध्ये तुम्ही असे म्हटले आहे की, भीमराव हत्तीआंबिरे यांनी औरंगाबाद, जालना, परभणी व इतर सर्व मिळून 9 ठिकाणचे भोजन पुरवठ्यांचे ठेके शासनाकडून निष्कृष्ट दर्जाचे जेवण देत असल्यामुळे आणि कालबाह्य बिस्कीटांचा पुरवठा केल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. मी येथे स्पष्ट करू इच्छितो भीमराव हत्तीआंबिरे व बहुजन हिताय संस्थेचा काडीमात्र संबंध नाही. सर्व भोजन ठेके हे बहुजन हिताय संस्थेअंतर्गत राबविले जातात. तसेच भीमराव हत्तीआंबिरे हे बहुजन हिताय संस्थेमध्ये कार्यकारिणीमध्ये या नमूद 9 ठिकाणी तसेच कुठेही कोणत्याही पदावर नियुक्त केलेले नाहीत. तसेच या भोजन पुरवठ्या ठेकेसंबंधी भीमराव हत्तीआंबिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे व्यक्तव्य व्हिडीओ क्लीपद्वारे करण्यात आले आहे. मी येथे स्पष्ट करु इच्छितो की, अंबड पोलिस स्टेशन येथे आपण म्हटल्याप्रमाणे भीमराव हत्तीअंबीरे यांच्याविरूद्ध कुठलाही गुन्हा दाखल नाही. तसेच व्हिडीओ क्लीपमध्ये आपण असे खोटे सांगितले आहे की, भीमराव हत्तीआंबिरे यांनी खोटा व बनावट ऑडिओ क्लीप तयार करुन समाजात सोशल मीडियावर पाठवून बदनामी केली आहे.

येथे मी स्पष्ट करु इच्छितो की, भीमराव हत्तीआंबिरे यांच्या मोबाईलवरून किंवा सोशल मीडियावरील कोणत्याही अकाऊंटवरुन तुमच्याविरुद्ध कोणत्याही ऑडिओ, व्हिडीओ व्हायरल केला गेला नाही. तसेच तुम्ही यू-ट्यूब चॅनलवर तयार करण्याअगोदर शासकीय परवानगी न घेता तसेच संबंधीत कार्यालयाला या व्हिडीओबद्दल कल्पना न देता भीमराव हत्तीआंबिरे यांच्याविरूद्ध खोटा व बनावट तसेच आरोप-प्रत्यारोप व्हिडीओ तयार केला आहे. मी येथे स्पष्ट करु इच्छितो की, तुम्हाला शासकीय जी. आर. ची चांगल्याप्रकारे माहिती आहे की, शासकीय सेवेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असतांना शासकीय कर्मचार्‍याला अशा प्रकारच्या व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल करण्याची परवानगी नसते. अशा प्रकारचा व्हिडीओ बनविणे व व्हायरल करणे हा कायदेशीर गुन्हा असून आपण कायद्याचा भंग केला आहे.

खोट्या अपूर्ण माहिती आधारे कुणाशी तरी संगनमत करुन तुम्ही भीमराव हत्तीआंबिरे यांच्याविरुद्ध खोटा व बनावट यू-ट्यूबवर तयार करुन जाणून बुजून व्हायरल केला आहे. असे की, तसेच या व्हिडीओमध्ये हत्तीआंबिरे हे तुमच्याविरुद्ध खोट्या बातम्या वर्तमानपत्रात छापतात असे म्हटले आहे. मी येथे स्पष्ट करु इच्छितो की, भीमराव हत्ती आंबिरे यांनी कोणत्याही वृतपत्रांमध्ये तुमच्या विरुद्ध बातमी छापण्यासाठी कुधीही कुठलेही पत्र दिलेले नाही अथवा तोंडी सुद्धा सांगितलेले नाही. कारण की, भीमराव हत्तीआंबिरे यांनी तुमच्याविरुद्ध कुठलीही बातमी देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे या नोटीसीमध्ये म्हटले आहे.  

व्हिडिओद्वारे प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न – या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, युट्यूबवरील बनावट व्हिडीओद्वारे हत्तीआंबिरे यांची प्रतिमा मलीन करण्याचा, समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे. हे कृत्य बेकायदेशीर असून कायदेशीर कार्यवाहीस पात्र आहे. त्यामुळे तुम्ही भा.दं.वि. कलम 500 अंतर्गत गुन्हा केला आहे. तसेच सायबर क्राइम कायदेअंतर्गतही खोट्या व्हिडीओ क्लीप तयार करुन खोटी बातमी समाजात व्हायरल करुन लोकांना भडकावलेले आहे व लोकांच्या मनात द्वेष निर्माण होईल अशा प्रकारची खोटी यू-ट्यूबवर व्हिडीओ क्लीप तयार केला आहे. या व्हिडीओ क्लीपआधारे लोकांनी हत्तीआंबिरे यांच्याविरूद्ध तक्रारी दाखल कराव्यात असे स्पष्टपणे तुम्ही लोकांना भडकवले असून लोकांना तक्रारी देण्यास प्रवृत्त करुन भाग पाडत आहेत. लोकांचे सहानुभूती मिळावी म्हणून या गोष्टींचा विचार करु हा यू-ट्यूब व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओ क्लीपमध्ये तुम्ही असे खोटे व्यक्तव्य केले आहे की, हत्ती आंबिरे यांनी तुमचा मोबाईल हॅक केला आहे.

असे की, आपण हत्तीआंबिरे यांना विकृत मनोवृत्तीचे म्हणून संबोधले असून खोटे व घाणरडे आरोप त्यांच्यावर केले आहे. समाजामध्ये खोटी बातमी तुम्ही भीमराव हत्तीअंबीरे यांच्याविरूध्द पसरवित आहात. तुमची औरंगाबाद येथून बदली व्हावी असे प्रयत्न हत्तीआंबिरे करीत आहेत, असे खोटे व्यक्तव्य केलेले आहे. मी येथे स्पष्ट करु इच्छितो की, असे कुठलेही निवेदन अथवा अर्ज कुठल्याही संबंधीत कार्यालयात हत्तीआंबिरे यांनी केलेला नाही. तसेच तुमच्या बदलीमुळे हत्तीआंबिरे यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होईल याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे या नोटीसीमध्ये म्हटले आहे.  

अहमदनगर-औरंगाबादमध्ये तक्रार दाखल – श्रीमती सोनकवडे यांनी युट्यूब चॅनेलवर केलेल्या व्हिडिओप्रकरणी औरंगाबाद येथील पोलिस आयुक्त कार्यालयात बाबासाहेब भराडे यांनी तक्रार दाखल केली असून, यासोबतच अहमदनगर येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दैनिक लोकमंथनचे संपादक अशोक सोनवणे यांनी तक्रार दाखल केली आहे.

COMMENTS